माढा आणि बारामतीतील वादाविषयी बोलताना कुल, निंबाळकर आणि गोरे नागपूरBaramati Dispute:आम्ही आज देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेलं होतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथे सविस्तर चर्चा झाली. बारामती आणि माढा या दोन्ही मतदारसंघात महायुतीत समन्वय असून निर्णय झाला पाहिजे. त्या संदर्भातील काही महत्त्वाची चर्चा होती. त्यासाठी नागपुरात आलो होतो, असं राहुल कुल म्हणालेत. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम सुरू केलं आहे. त्यात समस्या टप्प्याटप्प्यावर येत आहेत आणि त्याचं निराकरण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे करत आहेत. समन्वय अधिक चांगला व्हावा त्यासाठी आवश्यक त्या सूचना आम्ही करतोत. माढा लोकसभामध्ये महायुतीच्या घटक पक्षांनी मदत करावी आणि बारामतीतही महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मदत करावी. ते गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले आहेत. केवळ माढा किंवा बारामतीत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा धर्म हा सर्वांनी पाळला पाहिजे. दौंडमध्ये महायुतीचा उमेदवार आहे. त्याच्यासाठी आम्ही काम करू आणि ते काम आम्ही सुरू केलेलं आहे, असं राहुल कुल म्हणाले.
टप्प्याटप्प्याने नाराजी दूर होईल- निंबाळकर :माढा लोकसभा मतदारसंघात काही अडचणी आहेत; मात्र पूर्वी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले. टप्प्याटप्प्याने चर्चेतून मार्ग काढायचा आहे. माढा पूर्वी शरद पवार यांनी लढवला असल्याने साहाजिक तिथे राष्ट्रवादीच्या लोकांचे प्राबल्य जास्त आहे. पूर्वी एकमेकांच्या विरोधात झालेले संघर्ष हे एकाच क्षणात दूर होत नाही. त्याला टप्प्याटप्प्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार दूर करतील अशी अपेक्षा असल्याच रणजित निंबाळकर म्हणाले आहेत.
तक्रार घेऊन आलो नाही- जयकुमार गोरे :कार्यकर्त्यांचे काही किरकोळ विषय असतातच. एका मतदारसंघात जेव्हा दोन नेते एकमेकांच्या विरोधात काम करत असतात तेव्हा अडचणी येत असतात. त्या अडचणीतून मार्ग काढून पुढे जाणे हा युतीचा धर्म असतो. त्या दृष्टिकोनातून काम करत असताना काही लोकांना स्थानिक अडचणी आहेत. त्यासाठी आपल्या नेत्याकडे आपले म्हणणे ते मांडत असतात. तसंच आम्ही आमच्या नेत्याकडे आमचं म्हणणं मांडलं आहे. युतीच्या तक्रारी संदर्भातला फार मोठा विषय नव्हता. निवडणुकी संदर्भात ज्या ठिकाणचे जे काही विषय होते ते आपल्या नेत्याच्या कानावर घालून त्या संदर्भात त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी हा आजच्या बैठकीचा मुख्य मुद्दा होता. फलटणमध्ये स्थानिक खासदार हे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते स्थानिक राजकारण करत असतात. त्या ठिकाणी थोडी समस्या आहे. बाकी ठिकाणी बऱ्यापैकी भाजपा ताकतीने काम करत आहे. आमचे सहकारी घटक पक्ष असलेले तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत ते चांगलं काम करत आहे. आमचा समन्वय खूप चांगला आहे. एक-दोन ठिकाणचा जो विषय आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे. त्यातूनही मार्ग निघेल. चर्चा झाली आहे. वाद संपेल आणि मार्ग निघेल. निवडणुकीत आलेल्या समस्येचे निराकरण करण्या संदर्भातली आजची चर्चा झाली. आम्ही कायम समाधानी आहोत, अजिबात चिंता करू नका असं जयकुमार गोरे म्हणाले आहेत.
हेही वाचा:
- गजानन कीर्तिकरांचा भाजपाला घरचा आहेर; जयंत पाटील म्हणाले 'आता जनतेनं गंभीरपणे घ्यावं' - Jayant Patil Attack On Mahayuti
- रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरण : एनआयएकडून दोन फरार आरोपींना कोलकातातून अटक - Rameshwaram Cafe Blast Case
- निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयारामांना ऊत, तिकिटासाठी कोणी कुठल्या पक्षात केला प्रवेश? - LOK SABHA ELECTION 2024