रामायणातील सीता आपल्या मुलीसह साईचरणी नतमस्तक शिर्डी ( अहमदनगर ) - Deepika Chikhalia Shirdi visit : रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकरणाऱ्या माजी खासदार दीपीका चिखलीया यांनी आपल्या मोठ्या मुलीसह श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं. रामनवमीच्या दिवशी शिर्डी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानं आत्मिक समाधान मिळल्याचं दीपीका यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय. आपल्या लहानपणापासून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असल्याची आठवण त्यांनी सांगितली. लहान असताना साई समाधीच्या जवळ बसल्याची आठवणही आज ताजी असल्याचंही त्या म्हणाल्या.
अयोध्येतील राम मंदीरात सूर्य तिलक पाहायला मिळाला याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या की, लोक म्हणतात ही वैज्ञानिक आणि आर्किटेक्चरटी किमया आहे. ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यांनी केलेला हा पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आयोध्येमध्ये साक्षात राम प्रकट झाल्याचा अनुभव लोक घेत आहेत.
रामायणातील सीता आपल्या मुलीसह साईचरणी नतमस्तक आजही तुम्हाला लोक सीता म्हणून ओळखतात त्यामुळे पुन्हा सितेची भूमिका करायला आवडेल का ? आणि सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दीपीका यांनी सांगितलं की, सीतेची भूमिका असेल तर ती मी जरुर करेन. 1991 साली मी खासदार होते. त्यावेळीही मी भाजपमध्ये होते आणि आजही भाजप बरोबरच असल्याच दीपिका म्हणाल्या. रामायण मालिकेतील राम व भाजपचे उमेदवार अरुण गोविल यांनी संविधानावर केलेल्या वक्तव्यावर दिपीकाला विचारले असता, आपण 22 एप्रिलला अरुण गोविल यांच्या प्रचारासाठी मेरठला जाणार असल्याचं त्या म्हणाल्या.
रामायण मालिकेत सीताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री व माजी खासदार दिपीका चिखलीया यांनी आपली मोठी मुलगी निधीसह आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी दीपीका यांनी आपल्या मुलगी निधीसह साईबाबांच्या द्वारकामाई व गुरुस्थानचेही दर्शन घेतले आहे. यावेळी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क विभागातील अधिकारी अनिल धरम यांच्याशी बोलताना दीपीका म्हणाल्या की , "दर गुरुवारी मी साईबाबांचे चरित्र वाचत असते आणि शिर्डीला श्रीरामनवमीच्या पावन दिवशी येवून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेवून मनाला आत्मिक समाधान मिळालंय."
हेही वाचा -
- Shirdi Saibaba Sansthan : शिर्डी साई मंदिरात उन्हापासून भाविकांचं होणार संरक्षण; साईबाबा संस्थानच्या वतीनं करण्यात 'ही' सोय
- 'वीर मुरारबाजी'मध्ये झळकणार राम-सीतेची जोडी, अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर - RAMAYANA FAME RAM SITA
- हेमा मालिनी ते कंगना रणौत पर्यंतच्या सेलिब्रिटींनी दिल्या रामनवमीच्या चाहत्यांना शुभेच्छा - ram navami