महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांना धमकी, रोहित पवारांचा 'तो' फोन आणि राम कदमांचे गंभीर आरोप - रोहित पवार चौकशी

एका विशिष्ट जातीला संपवण्याची भाषा करणारी एक क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झालीय. याप्रकरणी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यातील संबंधितांची चौकशीची मागणी आमदार राम कदम यांनी सभागृहात केली.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 1:28 PM IST

Updated : Feb 29, 2024, 1:58 PM IST

मुंबई Devendra Fadnavis Threat : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. यावरुन आता राजकारणही तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांचंही नाव या प्रकरणात समोर आलंय. या सर्व प्रकाराची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलीय.

मुंबई पोलिसात गुन्हा दाखल :उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध कलम 153(A), 500, 505(3), 506(2) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केलाय

फडणवीसांना धमकी : समाज माध्यमांवर एक चिथावणीखोर क्लिप व्हायरल झालीय. या प्रकरणी अजय पनवेलकर यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. या क्लिपमध्ये एक व्यक्ती मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत तसंच मराठा समाजाचे राज्य कसं राहील याबाबत बोलत आहे. तसंच योगेश सावंत नावाची ही व्यक्ती एका विशिष्ट समाजाला तीन मिनिटात संपवू आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धडा शिकवू, असं म्हणत आहे.

रोहित पवारांनी केला फोन? : "याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत योगेश सावंत याला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला फोन करून सदर व्यक्तीला सोडून देण्यात यावं, असे सांगितलंय. रोहित पवार यांचा या व्यक्तीशी काय संबंध? त्यांनी का फोन केला? याबाबत चौकशी व्हावी," अशी मागणी आमदार राम कदम यांनी सभागृहात केली. तसेच यावेळी बोलताना आमदार राम कदम यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत "राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराच्या कारखान्यावर कशी दगडफेक करायची याबाबत बैठक झाली होती," असंही यावेळी सभागृहात सांगितलं.

सर्व प्रकाराची चौकशी होणार : आमदार आशिष शेलार यांनीही या संदर्भात लवकरात लवकर चौकशी करून संबंधित प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केलीय. यानंतर तालिका अध्यक्ष यांनी याबाबत सरकारला निर्देश दिले. "हा प्रकार अतिशय गंभीर असून या संदर्भात राज्य सरकारच्या वतीनं चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल," अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिली.

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्र्यांची बनावट सही प्रकरण : कोणालाही पाठिशी घालणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून - नाना पटोले
  3. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं... - एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
Last Updated : Feb 29, 2024, 1:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details