महाराष्ट्र

maharashtra

सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलं, पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा - Heavy rain in Satara

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 10:54 PM IST

Heavy rain in Satara : हवामान विभागाच्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यात रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. पावसामुळं कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 2 टीएमसीनं वाढ झाली असून पाण्याची आवक 38 हजार क्युसेकवरून 64 हजार क्युसेकवर गेली आहे. पुढील 24 तासांत काही ठिकामी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Rain lashed Satara district
साताऱ्यात मुसळधार पाऊस (Etv Bharat Reporter)

सातारा Heavy rain in Satara :हवामान विभागानं दिलेल्या अलर्टनुसार रविवारी दिवसभर सातारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला असून कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं पुढील चोवीस तासात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून मंत्रालयातील नियंत्रण कक्षानं नागरीकांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.

साताऱ्यात मुसळधार पाऊस (ETV BHARAT Reporter)

कोयनानगर आणि नवजात 303 मिलीमीटर पाऊस : कोयनानगर आणि नवजा याठिकाणी सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान तब्बल 307 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. कोयनानगरमध्ये 122 मिलीमीटर, तर नवजा येथे 185 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या तुलनेत महाबळेश्वरला केवळ 52 मिलीमीटर पाऊस झालाय. नवजा याठिकाणी 1 जूनपासून आज अखेर एकूण सर्वाधिक 2210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 33 टीएमसी :पश्चिम भागातील पावसामुळं कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं अवघ्या 9 तासात पाणीसाठ्यात 2 टीमसीनं वाढ झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 33.28 टीएमसी झाला आहे. तसंच 24 तासात धरणात 38 हजार क्युसेक इतकी आवक सुरू होती. ती अवघ्या सहा तासात 64 हजार 58 वर पोहचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details