महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरात गुटख्याच्या गोडाऊनवर छापा, 3 कोटी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त - Gutkha Seized In Latur - GUTKHA SEIZED IN LATUR

Gutkha Seized In Latur : लातूर शहराच्या अतिरिक्त एमआयडीसी परिसरात सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाने छापा टाकत 3 कोटी 5 लाख 73 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी बिहार, राजस्थान मधील दोघांसह 7 जणांना पोलिसांनी अटक करत गुन्हा दाखल केला आहे.

Gutkha Seized In Latur
गुटखा जप्त (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 10:53 PM IST

लातूरGutkha Seized In Latur :लातूर शहरातील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात असलेल्या धनंजय कोंबडे यांच्या मालकीच्या कोंबडे ऍग्रो वेअर हाऊसमध्ये गुटखा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांना मिळाली. उपलब्ध माहितीच्या आधारे धाड टाकली असता 3 कोटी 5 लाख 73 हजार रुपयांचा गुटखा आणि अन्य साहित्य सापडले असून यामध्ये 7 आरोपींना अटक करून लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात 362/2024 कलम 328, 188, 272, 273, 328, 34 भादंवि आणि अन्नसुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गुटखा व्यवसायाचे बिहार, राजस्थान असे परराज्य कनेक्शन समोर आले आहे.

गुटखा जप्तीविषयी सांगताना पोलीस (ETV Bharat Reporter)

आरोपीचे आंतरराज्य कनेक्शन :गुटखा साठवणूक प्रकरणात अडकलेल्या आरोपींचे आंतरराज्य कनेक्शन आढळून आले आहे. यामध्ये खालील आरोपींचा समावेश आहे.
1) अंकुश रामकिशन कदम, रा. रामवाडी, ता.चाकूर, जि.लातूर
2)हसनाकुमार तिलाही उराम, रा.सहाबगंज ता. पिराम जि. अरिरिया (बिहार)
3)गोकुळ धनाराम मेघवाल, रा. चुवा तहसील ठेंगाणा जि. नागोर ( राजस्थान )
4)धनंजय गहिनीनाथ कोंबडे, रा. लातूर
5)पारस बालचंद पोकरणा, रा. लातूर
6)विजय केंद्रे, रा.लातूर
7)राम केंद्रे, रा. लातूर

'या' पोलिसांनी बजावले कर्तव्य :ही कारवाई लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, विष्णू गुंडरे, शिवराज अनंतवाड, धडे, पेदेवाड, रायबोळे, शिंदे यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा :

  1. 19 वर्षीय मुलीला 26 आठवड्याच्या गर्भपाताला न्यायालयाची परवानगी; ससून रुग्णालयाला मुलीची काळजी घेण्याचे निर्देश - Mumbai HC On Girl Abortion Case
  2. 'VNIT'च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, दरवाजा तोडून काढला मृतदेह बाहेर - VNIT student suicide
  3. 1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्स, ट्रॅफिक संबंधित नियमात मोठे बदल; मोफत आधार कार्ड अपडेट होणार - Rules Changes From 1 June 2024

ABOUT THE AUTHOR

...view details