महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, 18 वर्षानंतर राज करणार धनुष्यबाणाला मतदान - Lok Sabha Election 2024

Rahul Shewale : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर आज (19 एप्रिल) महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी शिवतीर्थ येथे राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मनसेचे नेते उपस्थित होते.

Rahul Shewale
राहुल शेवाळे

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 5:05 PM IST

मुंबईRahul Shewale : देशाच्या आणि मोदींच्या विकासकामांसाठी आपण महायुतीला पाठिंबा देणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यावर पहिल्यांदाच महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. शिवाजी पार्क येथील राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी आज (शुक्रवारी) भेट घेतली. या भेटीच्यावेळी आमदार सदा सरवणकर, मनसे नेते संदीप देशपांडे, माजी आमदार तुकाराम काते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा : मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. यावेळी लोकसभा निवडणुकीची रणनीती तसंच 17 मे रोजीची महायुतीची सभा याबाबत राज ठाकरेंशी चर्चा केली. सभा आणि प्रचार कशा प्रकारे सुरू आहे याचीही राज ठाकरेंनी विचारपूस केली. तसंच काही सूचना देखील दिल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी माध्यमांना दिली.


18 वर्षानंतर राज करणार धनुष्यबाणाला मतदान : या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल शेवाळे म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट प्रेरणादायी ठरली. मनसेच्या स्थापनेनंतर जवळपास 18 वर्षांनंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच धनुष्यबाण या चिन्हाला मत देणार आहेत. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तसंच 17 मे रोजीच्या महायुतीच्या सभेत राज ठाकरे सर्वांना मार्गदर्शन करून महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देतील, असं खासदार राहुल शेवाळे म्हणाले.


काळजी घेण्याचा राज ठाकरेंचा सल्ला : या सदिच्छा भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी मला दिलेल्या सल्ल्यांवरून त्यांची संवेदनशीलता दिसून आल्याचे राहुल शेवाळे म्हणाले. सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. यामुळे सभा आणि प्रचारात स्वतःची विशेष काळजी घेण्याचा सल्ला राज ठाकरेंनी दिला. प्रचार करताना सोबत थंड पाण्याची बाटली आणि उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सोबत ओला रुमाल ठेवण्याचा सल्ला राज ठाकरेंनी आपणाला दिला, असं राहुल शेवाळेंनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. चंद्रपुरात तीन वाजेपर्यंत 43.48 टक्के मतदान; मुनगंटीवारांचं कमळ फुलणार की काँग्रेस प्रतिभा राखणार? - Chandrapur Lok Sabha
  2. भंडारा-गोंदिया मतदारसंघात तीन वाजेपर्यंत ४५.८८ टक्के मतदान - Bhandara Gondia Lok Sabha
  3. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान - Lok Sabha Election 2024 Live Update

ABOUT THE AUTHOR

...view details