सांगली Rahul Gandhi Maharashtra Visit : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याहस्ते कडेगाव येथे दिवंगत पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक पुतळयाचं उद्घाटन (Late Patangrao Kadam Statue Unveil Sangli) झालं. यावेळी राष्ट्रवादी - SP पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते रमेश चेंनीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार छत्रपती शाहू महाराज, विजय वडेट्टीवर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम उपस्थित होते.
विश्वजीत कदम भावनिक : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याहस्ते कडेगाव येथे दिवंगत पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक पुतळ्याचं उद्घाटन झालं. यावेळी राहुल गांधी यांनी स्मारकस्थळी कदम कुटुंबाची भेट घेतली. याप्रसंगी विश्वजीत यांच्या आई विजयामाला कदम यांची गळा भेट घेतली, यावेळी विश्वजीत कदम भावनिक झाले होते.
पतंगराव कदम एकनिष्ठ :"डॉ पतंगराव कदम यांनी आपलं संपूर्ण आयुष्य काँग्रेस, महाराष्ट्र आणि देशासाठी दिलं. त्यांनी शिक्षण आणि विकासाशी संबंधित कामं केली आणि आयुष्यभर काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले. इंदिरा गांधी निवडणुकीत पराभूत झाल्या तेव्हाही पतंगराव कदम त्यांच्या पाठीशी उभे होते," असं म्हणत राहुल गांधी यांनी पतंगराव कदम यांच्या एकनिष्ठेची आठवण करुन दिली.