पुणे Pune Police : पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी सध्या गेल्या काही दिवसांपासून ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणं वाढत आहेत. पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर दररोज पुणे पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हबाबत कारवाई करण्यात येत आहे. अशातच आता पुणे वाहतूक पोलिसांनी कडक पाऊलं उचलत यापुढं जर कोणी चालक दारु पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचं ड्रायव्हिंग लायसेन्स 3 महिने रद्द केलं जाणार आहे. तसंच त्याच व्यक्तीनं जर पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा केला तर त्या संबंधित व्यक्तीचा 6 महिन्यापर्यंतचा परवाना रद्द होईल आणि शेवटी तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती जर ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये आढळून आली तर त्या व्यक्तीचं ड्रायव्हिंग लायसेन्स हे कायमस्वरुपी रद्द होणार आहे.
पुणेकरांनो सावधान...! वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या 'या' निर्णयामुळं तुमचं ड्रायव्हिंग लायसेन्स होऊ शकतं रद्द - Pune Police - PUNE POLICE
Pune Police : पुणे वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हविरुद्ध कडक पावलं उचलली आहेत. यापुढं जर कोणी पुणेकर दारु पिऊन गाडी चालवताना आढळल्यास त्याचं ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द होऊ शकतं.
Published : Jul 10, 2024, 10:58 PM IST
आरटीओला प्रस्ताव : पुण्यात वाढणाऱ्या ड्रंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून आता कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. पुण्यात गेल्या 6 महिन्यांत 1684 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारु पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले दाखल करुन त्यांच्यावर कारवाई केली जात होती. मात्र यापुढं जर कोणी चालक दारु पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचं ड्रायव्हिंग लायसेन्स 3 महिने रद्द केलं जाणार आहे. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा तीच व्यक्ती जर ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये आढळून आली तर त्या व्यक्तीचं ड्रायव्हिंग लायसेन्स हे कायमस्वरुपी रद्द होऊ शकतं. या वर्षभरात जे काही 1684 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशा 1684 जणांचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओला पाठवण्यात आल्याचं पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त रोहिदास पवार म्हणाले.
दुचाकीस्वारांचा मोठ्या प्रमाणात समावेश : पुणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर ड्रंक अँड ड्राईव्ह च्या घटना घडत आहेत. वर्षभरात जे गुन्हे घडले आहेत, त्यात 25 ते 40 वय असणाऱ्या लोकांकडून अशा घटना घडल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे दुचाकीस्वारांच्या जास्त घटना असून नागरिकांनी हेल्मेटचा वापर हा जास्तीत जास्त करावा, असं आवाहन देखील यावेळी पवार यांनी केलं आहे.
हेही वाचा :