महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुन्हेगारांनी रिल्स टाकू नये! पुणे पोलिसांनी गजा मारणे, नीलेश घायवळसह गुंडांची काढली परेड - Gangsters parade in Pune

Gangsters parade in Pune : पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार यांची नियुक्ती झाल्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आली आहे. पुणे पोलिसांनी आज शहरातील 200 हून अधिक गुंडांची शहरात परेड काढली आहे.

Gangsters parade in Pune
Gangsters parade in Pune

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 8:35 PM IST

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची प्रतिक्रिया

पुणेGangsters Parade In Pune : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यातील गँगस्टर नीलेश घायवळसोबतचा फोटो ट्विट करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आता यापुढे रोज एक फोटो ट्वीट करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं संजय राऊतच्या ट्विटनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहेत. पुणे पोलिसांनी आज शहरातील गुन्हेगार तसंच टोळीच्या म्होरक्यांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांची परेड घेण्यात आलीय. या गुन्हेगारांमध्ये गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके अशा 10 टोळीप्रमुखांचा समावेश होता. शहरातील 200 हून अधिक गुन्हेगारांना बोलावून परेड काढण्यात आली.

गुन्हेगारांना कडक इशारा :यापुढं कोणत्याही गुन्हेगारांनी रिल्स बनवू नये, असा कडक इशारा गुन्हेगारांना देण्यात आला आहे. या गुन्हेगाराकडून कोणताही गुन्हा घडू नये यासाठी आज शहरातील 200 हून अधिक गुन्हेगारांना आयुक्तालयात बोलण्यात आलं होतं, असं गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितलं. यापुढं गुन्हा केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही गुन्हेगारांना दिला आहे. ही आमची नियमित परेड असल्याचं देखील झेंडेंनी म्हटलंय. पुणे पोलिसांनी आज परेडसाठी बोलावलेल्या गुन्हेगारांमध्ये नीलेश घायवळ, गजानन मारणे, बाबा बोडके, सचिन पोटे, मतीन शेख, बंडू आंदेकर टोळी, उमेश चव्हाण, बापू नायर, खडा वसीम यांचा समावेश होता.

खासदार राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका : दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची भेट घेतली होती. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले होतं. त्याचवेळी विजय वडेट्टीवार, संजय राऊत यांनीही सरकारवर टीका केली होती. तसंच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ट्वीट करून त्यांच्यावर निशाणा साधला होता.

हे वाचलंत का :

  1. निवडणूक आयोगाचा शरद पवारांना झटका, राष्ट्रवादी पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह दिलं अजित पवार गटालागुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
  2. चंदा कोचर यांची अटक बेकायदेशीर, उच्च न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details