महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ड्रग्ज व्हिडिओनंतर पुणे पोलीस आणि महानगरपालिकेकडून पब, हॉटेलवर 'बुलडोझर' - Pune Drugs Case - PUNE DRUGS CASE

Pune Drugs Case : पुण्यातील ड्रग्स व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलीस आणि महानगरपालिकेकडून पब, हॉटेलवर कारवाई करण्यात येत आहे. आज देखील महापालिकेच्या माध्यमातून अनधिकृत पब आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली.

Pub and hotel
पब, हॉटेलवर 'बुलडोझर' (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 8:09 PM IST

पुणे Pune Drugs Case : पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एका नामांकित हॉटेलच्या बाथरुममध्ये तरुण अमली पदार्थ घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या नंतर पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरण पुढं आल्यानं सर्वांकडून तीव्र प्रतिक्रया येऊ लागल्या यानंतर प्रशासनानं बेकायदेशीर पब्सवर कठोर कारवाईला सुरुवात केली आहे.

पुणे पोलीस आणि महानगरपालिकेकडून पब, हॉटेलवर 'बुलडोझर' (ETV Bharat Reporter)

इसको बारवर मोठी कारवाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना बुलडोझरच्या वापरासह अमली पदार्थांशी संबंधित बेकायदा बांधकामांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनानं काल सकाळी फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत हॉटेल आणि पब पाडण्यास सुरुवात केली. काल 26 ठिकाणी कारवाई केल्यावर आज देखील महापालिकेच्या माध्यमातून अनधिकृत पब आणि हॉटेलवर कारवाई सुरू केली. आज पाषाण या ठिकाणी देखील पोलीस आणि महापालिकेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील बाणेर येथील इसको बारवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका : पुण्यातील शिवाजीनगर भागातील एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले ड्रग्ज घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच टीका केली होती. विद्येचं माहेरघर समजलं जाणाऱ्या पुण्यात राजरोसपणे ड्रग्जची विक्री होत असून, गृहविभाग, सरकार काय करत आहे? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. दरम्यान, ड्रग्जवरून सत्ताधारी, विरोधकांमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचही निलंबन : या प्रकारात पुणे पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल करून 8 आरोपींना अटक केलीय. या प्रकरणातील 6 आरोपींना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास सुरू आहे. तसंच उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनाही हे प्रकरण भोवलं असून कर्तव्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 1 निरीक्षक तसंच 1 दुय्यम निरीक्षक यांना निलंबित करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. पुणे ड्रग्ज प्रकरणाचं राजकारण नको; सरकारचं विरोधकांना आवाहन, सीबील स्कोर प्रकरणीही बँकांना दिला इशारा - Devendra Fadnavis on CIBIL Score
  2. पुणे ड्रग्ज प्रकरण; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन - Pune Drugs Party Case
  3. पुणे ड्रग्ज प्रकरण; 8 आरोपींना अटक, दोन पोलीस आणि दोन बीट मार्शल निलंबित - Pune Drug Case

ABOUT THE AUTHOR

...view details