महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आलिशान कार चालवून दुचाकीला धडक दिल्यानं फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू - PUNE HIT AND RUN CASE

पुण्यात खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं चारचाकी वेगानं चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमाराला झाला.

Pune Hit and run case
पुणे हिट अँड रन (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2024, 11:21 AM IST

Updated : Oct 11, 2024, 12:52 PM IST

पुणे:- पुण्यातील कल्याणी नगर येथे काही महिन्यांपूर्वी हिट अॕण्ड रनची घटना घडलेली असताना पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या महागड्या चारचाकीनं दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराच जागीच मृत्यू झाला. या अपघातात रौफ अकबर शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी आयुष तायल (34) तायल हा रांजणगाव एमआयडीसीमधील एका फर्ममध्ये वरिष्ठ अधिकारी आहे. तायल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आलिशान चारचाकी चालविताना आयुष तायलनं २ दुचाकींना धडक दिली होती. क पहिल्या धडकेत काही लोक वाचले आहेत. त्यानंतर पुढे काही मीटर अंतरावर दुसऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत रौफ शेख याचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर रात्री १ वाजता हा अपघात घडला आहे. या घटनेत कारचालक दारुच्या नशेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघात झाल्यावर चालक भरधाव पळून गेला होता. पोलिसांनी सीसीटीटीव्ही तपासून आरोपीला तातडीनं अटक केली आहे.

पुण्यात हिट अँड रन (Source- ETV Bharat Repoter)

पोलिसांनी काय सांगितलं?याबाबत पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी माहिती दिली. ते म्हणाले, " पहाटे एक ते दोन वाजल्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनानं दुचाकी चालकाला धडक दिली होती. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला. या अनुषंगानं सीसीटीव्ही तपासून 35 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे." या प्रकरणानंतर पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पुण्यात पुन्हा हिट अँड रनची चर्चा- "आरोपीनं दारूच्या नशेत हा अपघात केला आहे का? याबाबतदेखील वैद्यकीय अहवालानंतर तपास करण्यात येणार आहे. मृत झालेला मुलगा हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता," अशी माहिती यावेळी पोलीस उपायुक्तांनी दिली. आलिशान कारचालकानं दुचाकीस्वाराला उडविलल्यानं पुन्हा शहरात हिट अँड रनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा-

Last Updated : Oct 11, 2024, 12:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details