महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोळ्या घातल्या तरी जिवंत राहू नये म्हणून पुन्हा कोयत्यानं वार, आंदेकर यांच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद - vanraj andekar murder - VANRAJ ANDEKAR MURDER

vanraj andekar murder case पुण्याच्या मध्यभाग असलेल्या आणि नेहेमी वर्दळीचं ठिकाण असलेल्या गणेश पेठ येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजल्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट) नेत्याची हत्या झाली. वनराज आंदेकर असे मृत माजी नगरसेवकाचं नाव आहे. या हत्येचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

vanraj andekar murder case
वनराज आंदेकर मृत्यू (Source- ETV Bharat reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 12:42 PM IST

Updated : Sep 2, 2024, 1:27 PM IST

पुणेvanraj andekar murder case - पुण्याच्या मध्यभाग असलेल्या आणि नेहेमी वर्दळीचं ठिकाण असलेल्या गणेश पेठ येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजल्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्याची हत्या झाली. वनराज आंदेकर असे मृत माजी नगरसेवकाचं नाव आहे. त्यांच्यावर 15 ते 16 जणांच्या टोळीकडून गोळीबार करण्यात आला. तसेच कोयत्यानं वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं असून सिनेस्टाईल हत्या करण्यात आल्याचं दिसून आले.

वनराज आंदेकर हत्येचा सीसीटीव्ही (Source- ETV Bharat)


माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पुण्यातील गणेश पेठ येथील घरासमोरच 15 ते 16 जणांच्या टोळीकडून त्यांच्यावर 5 राउंड फायर करण्यात आलं. यात वनराज गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेने पुणे शहरात पुन्हा गँगवॉर सुरू झाली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


आधी गोळ्या घातल्या, त्यानंतर कोयत्यानं वार-शरद मोहोळ याच्या खूनानंतर पुणे शहरातील हा दुसरा खळबळ उडवून देणारा खून आहे. वनराज आंदेकर हे निवांत गप्पा मारत उभा असताना आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळीनं त्यांच्यावर सिनेस्टाईल हल्ला केला. गंभीर बाब म्हणजे टोळीतील किमान पाच जणांच्या हातात बंदुक होती. तर बाकीच्यांनी शर्टमध्ये लपवून कोयते आणले होते. या पाचही आरोपींनी अचानक फायरिंग सुरू केली. तर एकाने वनराज यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या. वनराज कंपाउंडच्या आतमध्ये गेल्यावर जिंवत राहू नये म्हणून त्यांच्यावर कोयत्यानं वार करण्यात आले. यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना फरासखाना पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या पथकानं अटक केली आहे.

बंदुकीच्या गोळ्यांनी नव्हे कोयता मारल्यानं मृत्यू-दोन संशयितांना स्थानिक पोलिसांनी तर अन्य एका संशयिताला गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांनी दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त पाटील म्हणाले, " काही गोळ्या झाडण्यात आल्याचा साक्षीदारांचा दावा आहे. पण आंदेकर यांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी जखमा झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. आंदेकर यांच्या कपड्यात रिकामे काडतूस सापडले आहेत. " पाटील पुढे म्हणाले. आंदेकर यांच्या कुटुंबीयांनी या हल्ल्यामागं नातेवाईका असल्याचा संशय व्यक्त करत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला. पोलीस अधिकारी पाटील म्हणाले, " मृताच्या नातेवाईकांनी एफआयआरमध्ये नऊ व्यक्ती आणि इतर पाच जणांची नावे दिली आहेत. वाद सुरू असल्यामुळे काही नातेवाईकांनी हल्ला घडवून आणल्याचा मृताच्या कुटुंबीयांना संशय आहे. या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे."

हेही वाचा-

Last Updated : Sep 2, 2024, 1:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details