महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलाचा 'कार'नामा! वडील, आजोबा अन् आता आई अटकेत; विशाल अग्रवालचा पोलीस पुन्हा घेणार ताबा - Pune Porsche accident case - PUNE PORSCHE ACCIDENT CASE

Pune Porsche accident case : पुणे हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असतानाच आता अल्पवयीन मुलाच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळं हे प्रकरण अजूनच चिघळण्याची शक्यता आहे.

pune car accident case mother of minor accused arrested
पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 8:57 AM IST

Updated : Jun 1, 2024, 3:40 PM IST

पुणे Pune Porsche accident case : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी नुकतीच मोठी अपडेट समोर आलीय. अल्पवयीन मुलाच्या वडील आणि आजोबानंतर आता त्यांच्या आईलाही अटक करण्यात आल्याची माहिती, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाच्या आईला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रक्ताच्या नमुन्यातील फेरफार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर आणि एक वॉर्ड बॉय आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी आरोपीच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने चक्क खासगी व्यक्तींकडून अदलाबदल करण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. तसंच ते नमुने अल्पवयीन मुलाच्या आईचे असल्याचंही सांगितलं जातं होतं. याचाच सविस्तर तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आईला अटक केली.

विशाल अग्रवालचा पोलीस पुन्हा घेणार ताबा :न्यायालयीन कोठडीत असलेला विशाल अग्रवालचा पोलीस पुन्हा ताबा घेणार आहेत. उद्या पुणे पोलीस विशाल अग्रवालचा ताबा घेत पुढीत तपास करणार आहेत.

शिवानी अग्रवालला पकडण्यासाठी पुणे पोलिसांचा 'मास्टरप्लॅन' :गेल्या ५ ते ६ दिवसांपासून शिवानी अग्रवाल पुणे पोलिसांना गुंगारा देत होती. आधी लुधियाना नंतर मुंबईमध्ये शिवानी फिरत होती. शोध लागू नये म्हणून मोबाईल बंद ठेवून पोलिसांना चकवा द्यायचा शिवानीचा प्रयत्न होता. इतर नंबरवरून शिवानी काही जणांच्या संपर्कात होती. मोबाईल लोकेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांनी अखेर शिवानीला शोधलं.

हेही वाचा -

  1. पुणे हिट अँड रन प्रकरणात डॉक्टर श्रीहरी हाळनोर, डॉक्टर अजय तावरे, अतुल घटकांबळे यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी - Pune Hit And Run Case Update
  2. ससूनचा पदभार स्वीकारताच डॉ चंद्रकांत म्हस्के 'ॲक्शन मोडवर'; म्हणाले... - pune hit and run case
  3. पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये खासगी व्यक्तींकडून फेरफार, ते चार जण कोण? - Pune Hit And Run Case Update
Last Updated : Jun 1, 2024, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details