महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटात खासगी बसला अपघात, दहा प्रवासी गंभीर जखमी - Private bus Accident in Melghat - PRIVATE BUS ACCIDENT IN MELGHAT

Private bus Accident in Melghat : मेळघाटात सेमाडोहजवळ खासगी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Private bus Accident in Melghat
मेळघाटात खाजगी बसला अपघात (Reporter ETV BHARAT MH)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 10:27 PM IST

अमरावती Private bus Accident in Melghat:मेळघाटात घातांक ते सेमाडोहदरम्यान धारणी-देडतलाईकडे जाणाऱ्या खासगी बसला अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं बस पलटलीय. या अपघातात एकूण दहा प्रवासी जखमी झाले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय.

घटांग ते सेमाडोह मार्गावर खळबळ :घटांग गावापासून सेमाडोहकडे जाताना एका खाजगी बस दुपारी साडेचारच्या सुमारास चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं पलटली. हा अपघात होताच घातांक ते सेमाडोह मार्गावर खळबळ उडाली. या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनातील प्रवाशांनी थांबून पलटलेल्या बसमधील प्रवाशांना वाचविण्यासाठी धावपळ केली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून सेमाडोह येथील प्राथमिक उपचार केंद्रात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. गंभीर जखमी असणाऱ्या प्रवाशांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

'या' रुग्णांना हलवलं अचलपूरला :या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अपघातात सोनाटी येथील रहिवासी शेख हरून (60), माकडा येथील रहिवासी राकेश पाटील (30), गोपी साबुलाल जामुनकर (50 ), सोमवालखेडा येथील रहिवासी सरस्वती बेठे (50), मनीषा डोंगरे (27), यांना सेमाडोह येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं होतं.

'हे' वाचलंत का :

  1. राज्यात पुढील दोन दिवस यल्लो अलर्ट, अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा - Yellow alert in Maharashtra
  2. आता नीट परीक्षेत घोटाळा? गुणांमध्ये प्रचंड वाढ; पालकांकडून परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’वर शंका, पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी - NEET exam scam
  3. राष्ट्रवादीच्या काही लोकांनी काम केलं नाही, पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांचा भुजबळांवर निशाणा - Hemant Godse On Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details