अमरावती Prisoners grew vegetables : एकीकडं संपूर्ण राज्यात नापिकी झाली असल्याची चर्चा होत असतानाच दुसरीकडं मात्र अमरावती येथील ब्रिटिशकालीन मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी अवघ्या दहा महिन्यात 15 लाखांचे भरघोस कृषी उत्पन्न घेतलं आहे. तसंच या कारागृहातील शेतीवर पिकवलेल्या जाणाऱ्या कृषी मालाचं सनियंत्रण राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत केलं जातं.
अमरावती : कारागृहातील कैद्यांनी अवघ्या दहा महिन्यात पिकवला पंधरा लाखांचा भाजीपाला - अमरावती
Prisoners grew vegetables : अमरावती जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी अवघ्या दहा महिन्यात तब्बल पंधरा लाखांचा भाजीपाला पिकवला आहे. हा भाजीपाला कैद्यांच्या रोजच्या भोजनासाठी वापरला जातो. याव्यतिरिक्त कारागृहात शेळीपालन सुद्धा देखील केलं जातं.
Published : Feb 15, 2024, 5:04 PM IST
|Updated : Feb 15, 2024, 5:39 PM IST
300 किलो भाजीपाल्याचा दररोज आम्ही पुरवठा :कारागृहात कैद्यांचे भोजन तयार करण्यासाठी दर दिवसाला भाजीपाला खरेदी करावा लागत होता. परंतु आता येथेच मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होत आहे. सकाळी 150 किलो आणि सायंकाळी 150 किलो असा एकूण 300 किलो भाजीपाल्याचा दररोज आम्ही पुरवठा करत असून कैद्यांच्या रोजच्या भोजनासाठी वापरला जातो. तर उर्वरित भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समिती मधून विकला जातो. तसंच दोन बैल जोड्या, एक बैलगाडी, शेतीविषयक काम करण्याची अवजारं यासोबतच पन्नासच्या वर असलेल्या शेळ्यांचं पालन सुद्धा या ठिकाणी केलं जातं. शेळ्या आणि बोकड यांची इथूनच विक्री सुद्धा केली जाते. यामधून सुद्धा चांगला नफा मिळत असल्याची माहिती कृषी सहाय्यक प्रतिभा विरुळकर यांनी दिली आहे.
कैद्यांच्या नावाचं स्पेशल कार्ड : शेतीत काम करणाऱ्या कैद्यांना प्रति दिवस 74 रुपये रोज दिले जातात. त्यांच्या नावे एक कार्ड तयार करून त्यावर पैसे जमा केले जातात. या मिळकती मधून ते आपल्या कुटुंबाला पैसे पाठवतात. तसंच सुट्टीवर जाताना सुद्धा त्यांना हे पैसे दिले जातात. कारागृहात पाच वर्षाची शिक्षा पूर्ण केलेल्या बंदींना खुल्या कारागृहात पाठवलं जातं. याच कैद्यांकडून शेतीची कामं करून घेतली जातात. शेतीची संपूर्ण कामं 30 ते 32 कैदी पार पाडतात. कारागृहात दाखल झालेल्या काही कैद्यांना शेतीविषयक कामांची काही माहिती राहात नाही. तर काहींना मात्र त्यातील चांगली माहिती असते. परंतु तरीही त्यांना नेमून दिलेली कामं ते व्यवस्थित पार पाडतात. जनावरांना चारा खायला देणं, शेळ्या चरायला घेऊन जाणं, दुभत्या जनावरांच्या धारा काढणं, ओलित करणं, अशी विविध कामं ते करतात.
हेही वाचा -
- 18 वर्षीय अथर्व ताकपिरेने 18 हजार रुपयांत केली आठ राज्यात भ्रमंती; घरच्यांचा विश्वास जिंकला आणि निघाला प्रवासाला
- आचारसंहितेपूर्वी 'या' प्रक्रिया झाल्या तरच यावर्षी अमरावतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश
- खुल्या कारागृहाचा सुधारगृहाकडे प्रवास; कैदी करतायत शेती, भाज्यांची विक्री आणि बरंच काही