महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तेलंगणातील कैद्याला जामीन मिळून वर्ष झालं तरी होता तुरुंगातच, विशेष सत्र न्यायालयानं केली सुटका

Prisoner of Telangana : अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात गुंतलेला तेलंगणातील एक आरोपी रामा कृष्णा मकेना याला एक वर्षापूर्वी जामीन मिळाला. मात्र, तरीसुद्धा त्याची तुरुंगातून सुटका झालेली नव्हती. ही बाब विशेष सत्र न्यायालयाच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीची तातडीने सुटका करण्याचा निर्णय दिला. वाचा काय आहे प्रकरण.

Special Sessions Court
विशेष सत्र न्यायालय

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 6:48 PM IST

मुंबई Prisoner of Telangana :तेलंगणातील एक आरोपी रामा कृष्णा मकेना याला एक वर्षापूर्वी जामीन मिळाला. तरी देखील प्रक्रिया पूर्ण न केल्यानं तो तुरुंगातच होता. त्यावर मुंबई विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी नुकतीच त्याची सुटका करण्याचा निर्णय दिला.



जामीन मंजूर एक वर्षांपूर्वीच, तरीही तुरुंगात :तेलंगणातील एक आरोपी रामा कृष्णा मकेना याच्याकडून सीमाशुल्क विभागाने (कस्टम विभाग) गांजा जप्त करत 2022 मध्ये आरोप ठेवला होता. अंमली पदार्थ प्रतिबंध 1985 कायद्यानुसार त्याच्यावर खटला सुरू झाला. तो मूळचा तेलंगाणा राज्यातील विहंगा, गडचोबाऊली, हैदरागुडा येथील आहे. अमेरिकेतून भारतीय टपालाद्वारे गांजा तस्करी करण्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेला होता. एक वर्षांपूर्वीच 8 फेब्रुवारी 2023 रोजी त्याचा जामीन मंजूर झाला. मात्र, महाराष्ट्रात त्याचं कुणीही जवळचं नातेवाईक नव्हतं. त्यामुळे त्याची सुटका रखडली होती. अखेर मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी त्याची परिस्थिती समजून घेत तातडीनं सुटका करण्याचा निर्णय दिला.



अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा आणल्याचा आरोप :रामा कृष्णा मकेना हा मूळचा तेलंगणा मधील राहणारा आहे. भारताच्या डीआरआय विभागाने अमेरिकेमधून टपालाद्वारे गांजा तस्करी करण्याच्या आरोपात त्याच्याकडून मुंबईत गांजा जप्त केला. 27 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने अंमली पदार्थ विरोधी प्रतिबंध कायदा 1985 नुसार त्याला अटक केली आणि खटला सुरू केला. मात्र तीन महिन्यात त्याचा मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर झाला.


वयोवृद्ध आई-वडील तेलंगाणात :आरोपीला मुंबईत कोणी ओळखीचं नव्हतं. त्यामुळे लीगल सर्विस वतीनं त्याच्या बाजूनं वकील भाग्येशा कुरणे यांनी बाजू मांडली. न्यायालयानं 8 फेब्रुवारी 2023 रोजी जामीन मंजूर केला होता. पण तरीदेखील जामिनासाठीचे पन्नास हजार रुपये रक्कम भरण्यासाठी त्याचे कोणीही ओळखीचे जवळचे नातेवाईक येथे नव्हते. त्याचे आई-वडील 84 वर्षांचे वृद्ध. तेही तेलंगणात असल्यामुळे त्याची सुटका होऊ शकत नव्हती. वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या नजरेस आणली. मुंबई सत्र न्यायालयाने ही बाजू उचलून धरत त्याला तात्काळ सुटका करण्याचा निर्णय जारी केला.


देशभरात जामीन मिळून देखील 5000 कैदी तुरुंगातच:या संदर्भात वकील भाग्येशा कुरणे म्हणाल्या की, ''राष्ट्रीय लीगल सर्विस भारत सरकार यांच्या अहवालानुसार अनेक कैदी रामाप्रमाणे जामीन मिळून देखील विविध कारणांनी तुरुंगातच खितपत पडलेले आहेत. असे 5000 कैदी देशभर आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत की, जामीन मंजूर झाला, की त्यांची तत्काळ सुटका केली पाहिजे. परंतु याबाबत अद्यापही भारताच्या आणि राज्याच्या विविध तुरुंगात जामीन मिळून देखील आरोपी तुरुंगातच आहे. रामाचे जवळचे कोणी नव्हते. त्यामुळे वकिलांनी न्यायालयाच्या ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर न्यायालयाने तातडीने आरोपीची सुटका केली.

हेही वाचा:

  1. Nagpur Crime News: स्वतःच्या दोन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला दुहेरी जन्मठेप
  2. बुलडाणा जिल्ह्यातील विषबाधा प्रकरणाची माहिती सादर करा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
  3. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या इंद्राणी मुखर्जीच्या माहितीपटाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती, नेमकं कारण काय?

ABOUT THE AUTHOR

...view details