महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंडिया आघाडीला केवळ बहुजनांची मते हवीत, नेतृत्व नको - ॲड. प्रकाश आंबेडकर - Prakash Ambedkar - PRAKASH AMBEDKAR

Prakash Ambedkar : इंडिया आघाडीला केवळ बहुजनांची मते हवी होती. यापेक्षा वेगळं त्यांच्या डोक्यात नाही. इंडिया आघाडीला संसदेमध्ये स्वतंत्र बहुजनांचं नेतृत्वच नको होतं, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला आणि आमचं तत्त्वज्ञान हायजॅक केलं, अशी टीकाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

Prakash Ambedkar
ॲड. प्रकाश आंबेडकर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 7:22 PM IST

मुंबई Prakash Ambedkar:लोकसभा निवडणुकांनंतर आता इंडिया आघाडीला फसवल्याचा आरोप होत असल्यानं वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्त केली आहे. आंबेडकर यासंदर्भात ट्वीटच्या माध्यमातून म्हणाले आहेत की, हे तेच पक्ष आहेत ज्यांनी सर्वांत आधी राज्यघटनेची पायमल्ली केली आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए 1 आणि 2 जेव्हा संविधानात सुधारणा करत होते, तेव्हा यांनी त्यावर मौन बाळगलं होतं आणि मवाळ हिंदुत्वाचं पांघरुन घेतलं होतं. या पक्षांना बहुजनांच्या मतांचा वापर करून आपला वाडा वाचवायचा होता आणि तो नव्याने बांधायचा होता. ते त्यांनी केलं असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

बहुजनांनी संधी गमावली :ॲड. आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, या निवडणूक प्रक्रियेत बहुजनांनी स्वत:चं स्वतंत्र राजकीय नेतृत्व उभं करण्याची आणि त्यांना संसदेत पाठवण्याची संधी गमावली आहे. आमचा लढा नेहमीच संविधान वाचविण्यासाठी राहिला आहे. किंबहुना हेच आमचं तत्त्वज्ञान आणि विचारधारा आहे. बहुजन मतदारांना हे किती वेळा मूर्ख बनवणार? खरंच यांनी बहुजन मतदारांना मूर्ख बनवून धोका दिला नाही का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

वंचितांच्या न्याय हक्काचा लढा लढणारच :ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, जर या पक्षांना संविधान वाचवायचे असते, सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांसाठी लढायचे असते तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती. तसंच, बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापनाच केली नसती, असं त्यांनी म्हटलं आहे. आमच्या ताकदीचा स्रोत जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम आहे. वंचितांच्या न्याय हक्काचा आणि संविधान रक्षणाचा आमचा लढा सुरूच राहणार आहे. आगामी काळात आम्ही मोठ्या ताकदीने आणि विश्वासाने जनतेच्या पाठिंब्यावर भरारी घेऊ, पुनरागमन करू, असा विश्वास त्यांनी या ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

  1. महाबळेश्वरातील विशाल अग्रवालच्या हॉटेलवर प्रशासनानं फिरवला बुलडोझर, 15 खोल्या जमीनदोस्त - Vishal Agarwal
  2. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमात क्रांती घडवणारे 'माध्यम सम्राट' रामोजी राव ! - ramoji rao success in MEDIA field
  3. कीर्तिकर यांच्या ऐवजी आम्हाला जागा मिळाली असती तर,...; कीर्तिकरांच्या पराभवावर काय म्हणाले नाना पटोले? - Congress Party

ABOUT THE AUTHOR

...view details