महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस कॉन्स्टेबलचा दारूच्या अतिसेवनाने मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय - Police Constable Death Case

Police Constable Death Case : मुंबई पोलीस दलाच्या सशस्त्र विभागात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा मृत्यू दारूच्या अतिसेवनाने झाला असल्याची बाब पोलीस चौकशीत उघडकीस आली आहे. दादर मध्य रेल्वे लोहमार्ग पोलीस केवळ फॉरेन्सिक अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.

Police Constable Death Case
पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 11:02 PM IST

मुंबईPolice Constable Death Case :दादर लोहमार्ग पोलिसांच्या प्राथमिक तपासात विशाल पवार याने मोबाईल फटका गॅंग आणि विषारी इंजेक्शन ही कथा रचलेली असल्याच्या संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी अद्यापपर्यंत चार जणांचे जबाब नोंदवून घेतले असून त्यात विशाल पवार यांच्या पत्नीचा जबाब देखील नोंदवला आहे. पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने तीन वेळा गर्भपात केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

विषारी इंजेक्शनमुळे उलट्या? :मुंबई पोलीस दलाच्या सशस्त्र विभागातील पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार (वय ३०) हे भायखळा येथील मुंबई बॉम्बस्फोटाचे साक्षीदार जमील खतलाम यांच्या घरावर गार्ड म्हणून नेमणूक करण्यात आली होती. २४ एप्रिलला ठाणे ते भायखळा असा लोकल ट्रेनने प्रवास करत असताना रात्री ९:३० वाजता सायन-माटुंगा रेल्वे स्थानका दरम्यान फटका गॅंगने त्याच्या हातावर फटका मारून त्याचा मोबाईल फोन खाली पाडून मोबाईल पळवून नेला. दरम्यान पवार यांनी रुळावर उडी टाकून त्याचा पाठलाग केला असता फटका गॅंगच्या टोळीने त्याला पकडून मारहाण केली आणि त्याच्या पाठीत विषारी इंजेक्शन देऊन त्याला लाल रंगाचे द्रव्य पाजले. त्यानंतर पवार यांची शुद्ध हरपली व ते रुळालगत मध्यरात्री १ वाजे पर्यंत पडून होते. त्यानंतर त्यांनी उठून माटुंगा रेल्वे स्थानक गाठले व सकाळी ट्रेन पकडून ११:३० वाजता ठाणे कोपरी येथे घरी गेले. त्यानंतर रात्री त्यांना उलट्या सुरू झाल्या व त्यांचा पुतण्या निलेश याने त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिलला खासगी रुग्णालयात दाखल केले, असा जबाब विशाल पवार यांनी कोपरी पोलिसांना दिला.

रेल्वे स्थानकावर नव्हे तर आढळला बिअरबारमध्ये :उपचार सुरू असताना बुधवारी १ मे रोजी विशाल पवार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कोपरी पोलिसांनी हा गुन्हा दादर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला. दादर मध्य रेल्वे जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, आणखी एक कलम 302 हे एफआयआर मध्ये वाढवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने संबंधित सीसीटीव्ही तपासणी केली असता विशाल पवार या कॉन्स्टेबल माटुंगा रेल्वे स्थानकात जबाबात सांगितल्याप्रमाणे आढळून न येता दादर पूर्व येथील कैलास लस्सीच्या गल्लीतील एका बारमध्ये रात्री १२.३० वाजताच्या सुमारास सीसीटीव्हीमध्ये दिसून आला.


विशाल नियमित मद्यपान करत असल्याची माहिती:विशाल पवार पवारने पोलिसांना दिलेला जबाब आणि पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्हीत तफावत आढळून आली असून विशाल पवारचे बँक डिटेल्स आणि सीडीआर पोलिसांनी काढले आहेत. बँक डिटेल्सवरून विशालच्या बँक खात्यात ३० एप्रिलपर्यंत शून्य बॅलन्स दिसून आला. तर १ मे रोजी त्याच्या बँक खात्यात ४७ हजार रुपये पगार जमा झाल्याचे दिसून आले. तसेच ठाण्यातील हिरा वाईन्स या दारूच्या दुकानातून बऱ्याच वेळा देशी दारू विकत घेतल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी विशाल पवार यांना कावीळ झाली होती असून प्राथमिक वैद्यकीय अहवालात आता देखील काविळीचा प्रादुर्भाव थोड्या प्रमाणावर आढळून आला आहे. त्यातच विशाल पवार नियमित मद्यपान करत असे. २८ एप्रिलला घरी गेल्यानंतर देखील विशालने अंड्याचे ऑम्लेट खाल्ले आणि पुतण्यासोबत मद्यसेवन केल्याचे उघडकीस आले आहे.

अंगठी विकून दारू घेतली :त्याचप्रमाणे विशाल यांच्या हृदयाला ७० ते ८० टक्के ब्लॉकेज होते. २७ एप्रिलच्या मध्यरात्री दादर पूर्व येथे बारमध्ये गेल्यानंतर विशाल पवार दादर पश्चिम येथे असलेल्या देशी दारूच्या दुकानात अंगठी विकून दारू विकत घेण्यासाठी गेला होता. मात्र, दुकानदाराने रोकड आणण्यास सांगितली. त्यावर विशाल याने सोन्याची अंगठी विकून पैसे आणले आणि दारू विकत घेतली. ज्या व्यक्तीला सोन्याची अंगठी विकली त्या व्यक्तीचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा :

  1. मडकं फोडतात विरोधक, मात्र फायदा होतो शरद पवारांनाच! विरोधकांनी मडकं फोडून जनतेत निर्माण केलाय असंतोष - Lok sabha election 2024
  2. "वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्ज्वल निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा", कोणी केली मागणी? - Hemant Karkare assassination
  3. राज्यात 33 विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात, अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार? - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details