ठाणेBarbala Obscene Dance : भिवंडी तालुक्यातील दापोडा रोडवरील वळपाडा येथील न्यू अप्सरा बारवर ऑर्केस्टा बार अँड रेस्टॉरंटच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत नृत्य करीत असतानाच नारपोली पोलिसांनी छापा टाकल्याची घटना समोर आली आहे. या छापेमारीत बार मॅनेजर, २ पुरुष वेटरसह ५ महिला वेटर (बारबाला) आणि ६ ग्राहकांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. या कारवाईने बार मालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पहाटेच्या सुमारास बारवर छापा :नारपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील दापोडा रोडवरील वळपाडा येथील न्यू अप्सरा बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत नाचत असल्याची माहिती मिळाली. सदर बार हा रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी २० जूनला पहाटेच्या सुमारास न्यू अप्सरा बारवर छापा टाकला. त्यावेळी बारबाला मंद प्रकाशात अश्लील हावभाव करून ग्राहकांना आकर्षित करीत असताना आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांवर नारपोली पोलीस ठाण्यात पोशि जनार्दन शिवाजी बंडगर यांच्या फिर्यादीवरून सर्वांवर भादंविच्या कलम २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना जाधव करीत आहेत.