महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात मोबाईल चोरीच्या संशयावरून महिलेचा खून; दोघांना अटक

Woman Murder In Pune : पुण्यात मोबाईल चोरीमुळे खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यावरून पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 11:20 AM IST

पुण्यात महिलेचा खून, सीसीटीव्ही समोर

पुणे Woman Murder In Pune : पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या मंडई परिसरात सोमवारी (12 फेब्रुवारी) खुनाची घटना घडली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन दोन जणांनी एका महिलेचा खून केला आहे. या खुनाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. वर्षा थोरात असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले या दोघांना अटक केली आहे.

काठीने मारहाण करण्यात आली : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली वर्षा थोरात ही फिरस्ता असून, तिला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्यवसाय करतो. 10 ते 15 दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता. हा मोबाईल वर्षा थोरातने चोरल्याचा त्याला संशय आला. या संशयावरून त्याने आणि गौरव यांनी वर्षा थोरातकडे मोबाईलबाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादही झाला. त्यावेळी वर्षाला काठीने मारहाण करण्यात आली. डोक्यात जोराने काठी लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी तपास करत दोघांना अटक केली आहे.

सोमवारी सकाळी फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्रीनाथ टॉकीजच्या जवळ वर्षा थोरात या महिलेवर हल्ला करण्यात आला. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिचा अगोदरच मृत्यू झाला होता. कोणीतरी या आरोपींना सांगितलं, की मृत महिलेने मोबाईल चोरला आहे आणि त्या संशयावरून या दोन्ही आरोपींनी वर्षा थोरात हीच्या डोक्यात मारून तिची हत्या केली आहे - संदीप गिल, पोलीस उपायुक्त, पुणे

काही दिवसांपूर्वी झाला होता गोळीबार : पुणे शहरात नुकतीच गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेत आकाश जाधववर गोळी झाडण्यात आली असून, त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. तसंच, अनिल सखाराम ढमाले (वय 52, रा. बालेवाडी) असं गोळी झाडून आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलजवळील दुर्गा कॅफेजवळ ही घडना घडली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details