नांदेड PM Narendra Modi Yavatmal Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ जिल्ह्यातील दौरा निश्चित झालाय. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान यवतमाळ येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी (PM Modi) हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहेत. मेळाव्यासाठी आलेल्या महिला प्रवासी यांच्यासाठी एसटी महामंडळाच्या नांदेड विभागीय कार्यालयानं २७५ बसचं नियोजन केलंय. त्यामुळं जिल्ह्यातून लांब पल्ल्यासाठी जाणाऱ्या बसचं नियोजन कोलमडणार असल्याचं दिसून येतंय.
प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल होणार : नांदेड विभागातून यवतमाळ विभागातील आगारामध्ये २७ फेब्रुवारीला एसटी बस पोहचणार आहेत. यासाठी सर्व नियोजन आगार विभागाकडून करण्यात आलंय. बसच्या चालकांसोबत आगारातून तीन लॉग शिट देण्यात येणार आहेत. त्यावर पूर्ण नोंदी घेतल्या जाणार आहेत. राळेगाव, दारव्हा आणि घाटंजी येथे पाठवण्यात येणाऱ्या बसची माहिती संबंधित विभाग, आगारास पाठवण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या सभेसाठी मोठ्या संख्येनं बस यवतमाळला पाठवण्यात येणार असल्यानं दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २८ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यातून २७५ बसेस सोडण्यात येणार आहेत - यासीन खान, आगार प्रमुख