महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई! दोन कोटीचं 'मेफेड्रोन ड्रग्स' केलं जप्त

Mephedrone drugs : पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून दोन कोटी दोन लाखांचं ड्रग्स आणि एक मोबाईल जप्त केला आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 10:10 PM IST

Updated : Mar 1, 2024, 10:19 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी

पिंपरी चिंचवड : Mephedrone drugs : पुणे शहरानंतर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील ड्रग्स संदर्भात मोठी कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी तब्बल दोन कोटींचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ससह एकाला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 1 मार्च) रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रा दिली आहे. नमामी शंकर झा (वय 32, रा. निगडी. मूळ रा. बिहार) असं आरोपीचं नाव आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांचं देखील नाव समोर येत आहे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथे रक्षक चौकाजवळ एक व्यक्ती एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून नमामी झा याला ताब्यात घेतलं. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल दोन कोटी दोन लाख 10 हजार रुपये किमतीचे दोन किलो 20 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे. हे ड्रग आरोपीनं विक्रीसाठी आणलं असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे. आरोपीनं ड्रग्स कुठून आणलं होतं. कुणाला विकण्यासाठी आणलं होतं? याचा सखोल तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्यांचंदेखील नाव समोर येत आहे. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यासंबंधात अधिकृत माहिती मिळालेली नाही.

2 किलो 38 ग्रॅम एम.डी. : तपास पथकातील स्टाफ आणि दोन पंच बोलावून त्याच्या ताब्यातील पिशवीची झडती घेण्यात आली. त्यामध्ये 2 कोटी 2 लाख रुपये किंमतीचा 2 किलो 38 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ तसंच 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन मिळून आल्यानं ते जप्त करण्यात आलं. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला शुक्रवारी (आज) न्यायालयात हजर केलं असता त्याला सात दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Last Updated : Mar 1, 2024, 10:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details