ETV Bharat / state

अनपेक्षित अन् अनाकलनीय! निकालाचे गुपित शोधावे लागेल, निकालावर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निकालावर अनपेक्षित आणि अनाकलनीय असे या निकालाचे वर्णन केलंय.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2024, 7:50 PM IST

मुंबई - 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले होते. यानंतर 23 नोव्हेंबर (शनिवारी) याचा निकाल लागला. या निकालात राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलंय, तर या निवडणुकीत जनता आम्हाला कौल देईल, असा विश्वास महाविकास आघाडीला होता. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडलीय. या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निकालावर अनपेक्षित आणि अनाकलनीय असे या निकालाचे वर्णन केलंय. आज त्यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते.

निकालाचं गुपित काय? : हा निकाल कसा लागला, हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. पण ज्यांनी ज्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि एखाद्या लाटेपेक्षा जशी त्सुनामी यावी तसा हा निकाल आहे. खरं तर हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटला की नाही? हा देखील एक प्रश्न आहे. आता निकाल लागला आहे, त्यांचे आकडेवारी मोठी आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा बोलले होते की, या देशात भारतीय जनता पक्ष एकच राहील. मग त्या दिशेनेच भाजपाचे आगेकूच सुरू आहे की काय? अशी भीती वाटायला लागलीय. जनतेने हे महायुतीला काय म्हणून मतदान केले हे समजत नाही. सोयाबीनला आणि कापसाला भाव मिळत नाही म्हणून मतदान केले का? शेतकरी आत्महत्या करतात म्हणून मतदान केले का? महिला या राज्यात सुरक्षित नाहीत म्हणून मतदान केलंय का? या प्रेमापोटी हा शब्द वापरता येणार नाही. पण या रागातून मत दिली की काय? हे काय समजत नाही. आम्ही राज्यभर मोठ्या सभा घेतल्या. प्रचार केला पण जी हे काय मतांची लाट उसळली ते पाहता हा निकाल अनाकलनीय आहे, असेच म्हणावे लागेल. हा निकाल कसा लागला. या निकालाची गुपित काय याचा शोध घ्यावा लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.

महागाईची शाब्बासकी म्हणून : एखाद्या लाटेपेक्षाही त्सुनामी यावी, तसे मतदान झाले. पण तूर्त तरी मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की, तुम्ही खचून जाऊ नका. आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. आम्ही विश्वास देतो. हा जर निकाल महाराष्ट्राच्या जनतेला मान्य असेल तर मग कोणीच काही बोलणार नाही. पण निकाल जर मान्य नसेल तर आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे आहोत. कोणी म्हणते की हा निकाल ईव्हीएमचा विजय आहे. तसे असूही शकते. लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट मतांवर दिसून येतो का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता लाडक्या बहिणीचा जर इम्पॅक्ट दिसत असेल तर मग बाकीचे प्रश्न नाहीत का? वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, ज्या महिला आमच्या सभेला येत होत्या त्यांच्यासमोर सुरक्षितता आणि घर कसे चालवायचे हा प्रश्न होता. कारण प्रचंड महागाईचा आगडोंब उसळलाय. आणि महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला लोकांनी मत दिली की काय? असे वाटते. आता टोमणा म्हणून बोलत नाही, पण आता तरी भाजपाचा अस्सल कोणीतरी मुख्यमंत्री होणार का? असा सवाल उद्धव ठाकरेने उपस्थित केलाय.

निकालात काहीतरी गडबड : दोन-अडीच वर्ष झाली पण शिवसेना कोणाची? यावर आम्हाला न्यायालयातून न्याय मिळत नाही. तसेच या निकालानंतर मी पहिल्यांदाच तुमच्याशी संवाद साधत आहे. शरद पवार किंवा कुठल्या काँग्रेसशी संवाद साधलेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पूर्ण कोरोना काळात महाराष्ट्राने मला कुटुंबप्रमुख भूमिकेत पाहिले. मी जे म्हटलं ते महाराष्ट्राने ऐकले आणि आताही मी तळमळीनं महाराष्ट्राला सांगत होतो. पण महाराष्ट्राची जनता अशी का वागली समजत नाही. माझा महाराष्ट्रतील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. परंतु या निकालात नक्कीच काहीतरी गडबड दिसते. मी सभा घेत होतो, तेव्हा प्रचंड गर्दी होती. महिला, शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे जनता कंटाळली होती आणि आमच्या सभांना प्रचंड गर्दी होती. दुसरीकडे मोदी-शाह यांच्या सभांना गर्दी होत नव्हती. खुर्च्या खाली होत्या. पण त्यांनी ठरवलं होतं. नेहमी तुमच्याच काय ऐकायचं. आम्ही तर तुम्हालाच मत देणार आहोत, असं कदाचित त्यांनी ठरवलं असावं. मात्र आमच्या सभेला यायचे ऐकायचे आणि आम्हाला मते मिळाली नाहीत. शेवटी हा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.

हेही वाचा -

  1. 15 राज्यांतील विधानसभा आणि 2 लोकसभेचे आज निकाल: पुढच्या काही तासांत होणार चित्र स्पष्ट
  2. मतमोजणीला सुरुवात; पुणे जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.