महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pension for Journalist : पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश, पत्रकार सन्मान योजनेच्या निवृत्ती वेतनात वाढ

Pension for Journalist : बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून निवृत्त पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सन्मान योजनेतून दरमहा देण्यात येणाऱ्या रक्कमेत राज्य शासनानं वाढ केलीय. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी केलाय.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 3:27 PM IST

मुंबई Pension for Journalist : बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून निवृत्त पत्रकारांना देण्यात येणारी रक्कम 11 हजारा ऐवजी 20 हजार करण्यात यावी, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आली होती. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन्मान योजनेची रक्कम 11 हजार ऐवजी 20 हजार करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज राज्य सरकारनं त्यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केलाय. त्यामुळं आता निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 20 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

निवृत्ती वेतन 20 हजार करण्याची घोषणा : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतून ज्येष्ठ पत्रकारांना सध्या 11 हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात येतं. त्यात वाढ करुन ती 20 हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. ही मागणी तत्काळ मान्य करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सन्मान योजनेची रक्कम 20 हजार रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र त्याचा शासन निर्णय जारी होत नसल्यानं मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रविण पुरो यांनी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्र्यांना जाब विचारुन घेराव घातला होता. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पदाधिकारी एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी शासन निर्णय जारी होईपर्यंत पाठपुरावाही केला.

शासन निर्णय जारी : पाठपुराव्यानंतर अखेर आज राज्य सरकारनं सन्मान योजनेची रक्कम 11 हजार ऐवजी 20 हजार करण्यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केल्यानं राज्यातील जेष्ठ पत्रकारांना मोठा दिलासा मिळालाय. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सततच्या पाठपुराव्यामुळं अखेर राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई यांच्याह मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

हेही वाचा :

  1. Shambhuraj Desai : पत्रकारांना २० हजार निवृत्ती वेतनाचा शासन निर्णय दोन दिवसांत जारी करणार - शंभूराज देसाई
  2. पत्रकारांनी सरकारला धरलं धारेवर; प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची केली मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details