'आस्था' एक्सप्रेसवर मनोरुग्णाकडून दगडफेक? नंदुरबार Surat Ayodhya Astha Express: सुरतहून अयोध्याकडे जाणाऱ्या 'आस्था एक्सप्रेस' वर मनोरुग्णाकडून दगडफेक झाल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात आली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून या घटनेचं खंडन करण्यात आलय. असा कुठलाही प्रकार घडला नाही. परंतु प्रवाशांकडून सांगण्यात आलेल्या दगडफेकीच्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून तपासणी केली असता त्या ठिकाणी एक मनोरुग्ण आढळून आला असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. संबंधित मनोरुग्णास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान 'आस्था एक्सप्रेस' नंदुरबार रेल्वे स्थानकावरून वेळेवर सुटल्याची माहिती देण्यात आली आहे.
'आस्था'एक्सप्रेसवर दगडफेक : सुरतवरून अयोध्याकडे जाणाऱ्या 'आस्था एक्सप्रेस'वर दगडफेक झाली असल्याच्या प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली होती. परंतु अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु ज्या ठिकाणी घटना घडली असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी एका संशयित मनोरुग्ण आढळून आला.
मनोरुग्ण व्यक्ती रुग्णालयात दाखल :मनोरुग्णाला रेल्वे पोलिसांकडून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. जिल्हा रुग्णालयात संबंधित मनोरुग्ण व्यक्तीला उपचारासाठी पाठवण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र रेल्वे पोलीस विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र अशी कुठलीही घटना न घडल्यामुळं आस्था एक्सप्रेस रेल्वे स्थानकावरून वेळेत अयोध्येच्या दिशेने निघाली आहे. परंतु या विषयाची पोलीस विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.
वंदे भारत ट्रेनवर दगडफेक : या आधीही अशीच एक घटना घडली होती. चेन्नई ते तिरुनेलवेली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर 4 फेब्रुवारी रोजी काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली होती. ट्रेन थुथुकुडी जिल्ह्यातील मनियाची रेल्वे स्टेशनवरून जात असताना ही घटना घडली होती. दगडफेकीत वंदे भारतच्या काही डब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसंच नऊ काचा फुटल्या होत्या.
हेही वाचा -
- लाल सिग्नल तोडून पुढं गेली शिवगंगा एक्स्प्रेस, प्रशासनाच्या सतर्कतेनं टळली ओडिशातील रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती
- चेन्नई ते तिरुनेलवेली वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, डब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
- Ahmedabad Howrah Express : नांदुरा रेल्वे स्थानकावर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसवर दगडफेक; पाहा व्हिडिओ