महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे स्थानकाचा 171 वा वाढदिवस : पहिल्या रेल्वेच्या आठवणींना दिला उजाळा, प्रवासी सुविधांवर भर देण्याची मागणी - Indian Railways completes 171 years - INDIAN RAILWAYS COMPLETES 171 YEARS

Indian Railways completes 171 years : देशातील पहिली रेल्वे ठाणे ते मुंबई या दरम्यान 16 एप्रिल 1853 मध्ये धावली होती. पहिली रेल्वे धावल्याच्या घटनेला आज 171 वर्षे पूर्ण झाले आहेत.

Indian Railways completes 171 years
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 2:28 PM IST

Updated : Apr 16, 2024, 7:43 PM IST

ठाणे स्थानकाचा 171 वा वाढदिवस

ठाणे Indian Railways completes 171 years :आशिया खंडातील सर्वात पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून ठाण्यापर्यंत धावली. या घटनेला आज 171 वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून भारतीय रेल्वेचं जाळं देशभरात यशस्वीपणे विस्तृत होत आहे. एप्रिल 1853 मधील पहिल्या रेल्वेपासून ते आधुनिक वंदे भारत रेल्वे गाड्यांपर्यंतचा भारतीय रेल्वेचा प्रवास झाला आहे. या कालावधीत पहिली शताब्दी एक्स्प्रेस, पहिली जनशताब्दी एक्स्प्रेस, पहिली तेजस एक्स्प्रेस आणि पंजाब मेल सारख्या काही जुन्या गाड्या 100 वर्षांनंतरही धावत असून प्रवाशांचा त्यांना प्रतिसाद कायम वाढत आहे.

काय आहे पहिल्या रेल्वेचा इतिहास :पहिली रेल्वेगाडी चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे 1900 मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली. कंपनीच्या सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्यकडं कानपूर आणि अलाहाबाद तसेच पूर्वेकडं नागपूर ते आग्नेयकडं रायचूरपर्यंत विस्तारल्या. 5 नोव्हेंबर 1951 रोजी निजाम संस्थान, सिंधिया संस्थान आणि ढोलपूर संस्थानातील रेल्वे यांचं एकत्रीकरण करुन मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या पाच विभागांसह मध्य रेल्वे ही महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये 4 हजार 275 मार्ग किमी पेक्षा जास्त अंतरावर पसरली असून या राज्यांमधील तब्बल 466 स्थानकांवर मध्य रेल्वे सेवा प्रदान करते.

प्रवासी संघटनेकडून जोरदार जल्लोष :रेल्वेला 171 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाण्यातील रेल्वे स्थानकामध्ये प्रवासी संघटनेच्या वतीनं रेल्वेचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या रेल्वेला 171 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाणे रेल्वे स्थानकात प्रवासी संघटनेच्या वतीनं रेल्वेच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी प्रवासी संघटनेनं मागणी ठाण्यात रेल्वेचं इंजिन लावलं आहे, तिथं नागरिकांसाठी सेल्फी पॉईंट उभारण्याची मागणी केली आहे. या रेल्वेची माहिती पत्रक लावावं, जेणेकरुन तरुण पिढीला रेल्वेबद्दल माहिती व्हावी. फलाटावर प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं लवकरात लवकर पावलं उचलावी, आधी मागण्या या प्रवासी संघटनेनं रेल्वे प्रशासनाकडं केल्या आहेत. यावेळी नंदकुमार देशमुख, पतंगराव देशमुख, स्टेशन मास्तर, रेल्वे पोलीस आणि अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थि होते.

आजही अनेक सुविधांपासून वंचित ठाणे स्थानक :ठाणे रेल्वे स्थानक 171 वर्षे जुनं असलं, तरीही सुविधांपासून हे स्थानक वंचित आहे. रेल्वे प्रशासनानं विविध योजनांमध्ये या स्थानकाचा सहभाग तर करुन घेतला. मात्र आजही प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. प्रत्यक्षात दहा लाख प्रवासी या रेल्वे स्थानकाचा वापर करतात. ठाणे जवळच नवीन स्थानक बनवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. लवकरच हे रेल्वे स्थानक प्रवाशांच्या अडचणींना थोडाफार सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र आजही 171 वर्षे झाले तरी अनेक स्थानक पाहिजे तसं हायटेक झालेले पाहायला मिळत नाही.

हेही वाचा :

  1. Mumbai Railway Station Rename : मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख; ब्रिटिशकालीन स्थानकांचं होणार नामांतर
  2. Womens Day 2024 : महिलांनी चालवली मालगाडी; लोको पायलट ते गार्ड सर्व महिलाच
  3. अंधेरी रेल्वे स्थानक बाहेरील शिल्पाचं अभिनेता टायगर श्रॉफच्या हस्ते उदघाटन
Last Updated : Apr 16, 2024, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details