मुंबई Vijay Wadettiwar : राज्यात सत्तेत बसलेले पक्ष जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम सरकारी यंत्रनेच्या माध्यमातून करत असतात. तर सरकार जेथे चुकलं त्याठिकाणी चूक दाखवायचं काम विरोधी पक्षाचं असतं. सत्ताधारी मुख्यमंत्री पदा इतका सन्मान विरोधी पक्ष नेत्याला आपल्या लोकशाहीत आहे. राज्यातील जनतेचे कैवारी सरकार असतं तर दुसरीकडं विरोधी पक्ष नेत्यांचाच निवासस्थानी पाणी गळती होत असेल तर याला जबाबदार कोण?, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी गळती लागली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना भांड्यांच्या साह्याने पाणी जमा करण्याची वेळ आली आहे. काही महिन्यापूर्वी बंगल्यावर लाखो रुपये खर्च केले तरी देखील पाण्याची धार लागत आहे. गेल्या दहा दिवसांपासून कार्यालयाचा टेलिफोन देखील बंद असून वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याची खंत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली आहे.
'प्रचितीगड' निवासस्थानी गळती लागली :मुंबई शहरांत पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका विरोधी पक्ष नेत्यांना बसला आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय 'प्रचितीगड' निवासस्थानी गळती लागली आहे. गळती सुरू असल्यानं ठीक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी भांडी ठेवली आहे. काही महिन्यापूर्वी या शासकीय निवासस्थानावर सरकारने लाखो रुपये खर्च केले आहे. मात्र, तरी देखील अशा प्रकारची पाण्याची धार लागणे म्हणजे केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. गेल्या आठ दिवसापासून कार्यालयाचा टेलिफोन सुद्धा बंद आहे. याविषयी वारंवार तक्रार करून देखील दाखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आता जास्त पाणी होऊन निवास्थान वाहून जाऊ नये अशा प्रकारचा आपण सरकारला सांगत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. जनता यांना पुरात वाहून नेऊन बुडवून टाकतील अशी परिस्थिती निर्माण होणारा असल्याचा विश्वास वडेट्टीवार व्यक्त केला आहे.