महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत एकाच दिवशी दोन अपघात; 3 जणांचा मृत्यू, कसा घडला अपघात? - Road Accident News

Road Accident News: भिवंडीत आज एकाच दिवशी दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या अपघातात एक महिला शिक्षिका आणि दुसऱ्या अपघातात दोन कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Bhiwandi Road Accident
भिवंडीत अपघात (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 10:51 PM IST

ठाणे Road Accident News :भिवंडीत आज दुपारच्या सुमारास दोन अपघाताच्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याच्या दुचाकीला अवजड ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या (Wheeler And Truck Accident) अपघातात पाठीमागे बसलेली महिला शिक्षिका जागीच ठार झाली. ही दुर्दैवी घटना भिवंडीतील डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर दुपारी घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत डाइंग कंपनीतील लोखंडी बॉयलर क्रेनच्या सहाय्यानं उचलत असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटल्यानं, बॉयलर अंगावर पडून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ट्रकच्या धडकेत शिक्षिका जागीच ठार (ETV BHARAT Reporter)



अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड ट्रक रस्त्यावर: पहिल्या घटनेत दुचाकीला अवजड ट्रकने धडक दिल्यानं शिक्षिका जागीच ठार झाली. शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड ट्रक रस्त्यावर कसे धावतात? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळं अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तेहसीन शहाबाज अंसारी (वय २५ वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे.



वर्षाभरापूर्वीच झाला होता विवाह : मृत शिक्षिका भिवंडीत कुटुंबासह राहात होती. ती भिवंडी तालुक्यातील महापोली गावातील एका उर्दू शाळेत शिक्षिका होती. खळबळजनक बाब म्हणजे मागील वर्षाभरापूर्वीच तिचा विवाह झाला होता. बुधवारी ही शिक्षिका आपल्या पती शहाबाज अंसारी यांच्यासह दुचाकीवरून वंजारपट्टी नाका येथील डॉ एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर आली असता, अवजड ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.



सुदैवाने पती बचावला :या अपघातात पती शहाबाज गंभीर जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भिवंडी शहरात होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका मिळण्यासाठी शहरात अवजड वाहनांना बंदी असताना, भर दुपारी अवजड वाहने उड्डाणपूलांवरून सोडली जात असल्यामुळं महिलेचा मृत्यू झाला आहे, असा आरोप होतय. त्यामुळं या महिलेच्या मृत्यूस अवजड वाहने आणि वाहतूक पोलिसांचा दुर्लक्षित कारभार जबाबदार असल्यासची प्रतिक्रिया, शहरातील दक्ष नागरिकांनी दिली आहे. या अपघाताच्या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.


दुसऱ्या अपघाताच्या घटनेत काय घडलं : डाइंग कंपनीतील लोखंडी बॉयलर क्रेनच्या सहाय्याने उचलत असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटल्यानं बॉयलर अंगावर पडून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील सरवली एमआयडीसी येथे दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. बाळाराम चौधरी (वय ५५ वर्ष) आणि पांडुरंग अबा पाटील (वय ६५) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघा कामगारांची नावे आहेत.



क्रेनचा पट्टा तुटला आणि बॉयलर मजुरांच्या अंगावर पडला: भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी येथे रौनक डाईंग लिमिटेड कंपनीत नवीन लोखंडी वॉटर प्री हिटर बॉयलर बसवण्याचं काम सुरू होतं. हा लोखंडी अवजड बॉयलर क्रेनच्या मदतीनं उचलून घेऊन जात असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटला आणि बॉयलर मजुरांच्या अंगावर पडला. त्यामुळं दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा -

  1. सिटी बसखाली चिरडून पाच वर्षीय चिमुकलीचा अंत - Nashik Accident News
  2. रील बनवणे जिवावर बेतले...; दोघांनी गमावला जीव तर तीन जण जखमी, पाहा व्हिडिओ - Nagpur Accident News

ABOUT THE AUTHOR

...view details