महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुसरं लग्न केल्याच्या रागातून एकाचा चुनाभट्टीत खून, सात जणांना अटक - One killed in Chunabhatti area

One killed in Chunabhatti area : दुसरं लग्न केल्याच्या रागातून चुनाभट्टीत एकाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांना सात जणांना अटक केली आहे.

One killed in Chunabhatti area
प्रतिकात्मक छायाचित्र (Reporter ETV MH)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 10:31 PM IST

मुंबईOne killed in Chunabhatti area :कुटुंबाच्या परवानगीशिवाय दुसरं लग्न केल्याच्या रागातून एकाची हत्या झाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात मुलाच्या कुटुंबातील एकाचा जीव गेलाय. तर, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. चुनाभट्टी येथे शुक्रवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. पोलीस उपायुक्त हेमराज राजपूती यांनी दिलेल्या माहितीनुसार, चुनाभट्टी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली आहे.

डोक्यात घातला दगड :चुनाभट्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबा खान यांनी कुटुंबाच्या संमती शिवाय दूसरं लग्न केलं होतं. शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास आसिफ उमर खान (वय 26), हे सबा खान यांचे कपडे आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. यावेळी सबाच्या माहेरच्यांनी आसिफसोबत वाद घालून त्याच्या डोक्यात दगड घातला. कसाबसा स्वतःचा बचाव करत आसिफ घरी पोहचला.

धारदार शस्त्रांनी हल्ला :रात्री एकच्या सुमारास अमन मोहंमद शमिम खान (वय 20), मोहंमद अनस युनूस शेख (वय 28), समा अनस शेख (वय 28), सना अमन खान (वय 21), शकील अहमद बाबू रजा शेख (वय 23), हुसेना बानो युनूस शेख (49), सलमान मोहंम्मद शमीम शेख (वय 25) अशा सबाच्या माहेरच्या मंडळींनी तिच्या सासरी येत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर या सर्वांनी अदनान सलीम कुरेशी (वय 24), आरीफ उमर खान (वय 26), इमरान सलीम कुरेशी (19) आणि आसिफ आर खान (वय 32) यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला.

सात जणांना अटक :या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय. घटनेची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील अदनान, आरिफ, इमरान आणि आसिफ यांना तातडीनं उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी अदनानला मृत घोषित केलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सात जणांना अटक केली आहे.

हे वाचलंत का :

  1. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोल्हापुरातील कळंबा कारागृहात विरोधी गटाकडून खून - Kalamba Jail Murder Case
  2. संशयातून आणखी एक 'श्रद्धा'कांड उघड! पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले 14 तुकडे - husband kills wife bhopal
  3. पिण्याचं पाणी मागण्यावरुन झाली बाचाबाची अन् घरमालकानं घेतला मिस्त्रीचा जीव - Youth Killed In Nanded

ABOUT THE AUTHOR

...view details