महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एनआयएची देशभरात छापेमारी; जैश ए मोहम्मद लिंक प्रकरणी अमरावती, भिवंडीतून दोन संशयितांना घेतलं ताब्यात - NIA RAIDS 19 LOCATIONS

जैश ए मोहम्मद कट्टरतावाद प्रकरणात एनआयएनं देशभरात छापेमारी केल्यानं मोठी खळबळ उडाली. या छापेमारीत अमरावती भिवंडीतून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

NIA Raids 19 Locations
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2024, 12:56 PM IST

Updated : Dec 12, 2024, 1:43 PM IST

मुंबई :जैश ए मोहम्मद कट्टरतावाद प्रकरणी एनआयएनं देशभरात छापेमारी केली आहे. या छापेमारीत अमरावती आणि भिवंडीतून दोघांना ताब्यात घेतलं आहे. एनआयएनं जैश ए मोहम्मद कट्टरतावाद प्रकरणी देशभरात छापेमारी केल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. एनआयएनं भिवंडीतील खोणी गावातून एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं असून कामरान अंसारी असं त्याचं नाव आहे. तर अमरावतीच्या छाया नगर परिसरातून एका तरुणाला एनआयएनं ताब्यात घेतलं. मात्र या तरुणाचं नाव अद्यापही अधिकृत सूत्रांनी दिलं नाही.

भिवंडीतून एका संशयित तरुणाला घेतलं ताब्यात :सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या पथकानं गुरुवारी पहाटेच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोणी ग्रामपंचायत भागातील एका खोलीवर अचानक छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान कामरान अंसारी याला ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेण्यात आलेला कामरान हा अनेक दिवसापासून याच खोलीत राहत असल्याचं तपासात समोर आलं आहे. आज पहाटेच्या सुमारास अमरावती मध्येही एनआयएच्या पथकानं छापेमारी करुन एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

इसिस मॉड्युल प्रकरणात पाच घराची झडती :२८ जून २०२३ रोजी एनआयए पथकानं नोंदवलेल्या इसिस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच ठिकाणी संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली. त्यावेळीही एनआयए पथकानं आरोपींच्या घराच्या झडती वेळी काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसिसशी संबंधित अनेक कागदपत्रं यासारखी अनेक गुन्हे करणारे साहित्य जप्त केले होते. जप्त केलेल्या साहित्याने आरोपींचे इसिस या दहशतवादी संघटनेशी सक्रिय संबंध आणि दहशतवादी संघटनेच्या भारतविरोधी अजेंडा पुढं नेण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न केल्याचं स्पष्टपणे समोर आल्याचं सांगण्यात आलं. गेल्या वर्षी भिवंडी शहरातून देशविघातक आणि दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या पीएफआयच्या तीन पदाधिकाऱ्यांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केली. शिवाय मुंब्रा भागातूनही गेल्या दोन वर्षात संशयिताना ताब्यात घेऊन अटक केली. तर २०१४ साली कल्याणमधून चार तरुण इसिसमध्ये भरती झाले. त्यामुळे ठाणे जिल्हयात आजही देशविघातक कारवायांसाठी काही जण सक्रिय असल्याचं पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यातील खोणी गावातून समोर आल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा :

  1. छत्रपती संभाजीनगरातील 50 जण ISIS च्या संपर्कात; जुन्या दंगलींचे व्हिडिओ दाखवून तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न - ISIS Chhatrapati Sambhajinagar
  2. छत्रपती संभाजीनगरात 'इसिस'चं जाळं! सोशल मीडियाद्वारे 50 तरुण गळाला; एनआयएच्या आरोपपत्रातून खळबळजनक खुलासा - ISIS Chhatrapati Sambhajinagar
  3. इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेची झाडाझडती, छत्रपती संभाजीनगरातून ग्राफिक डिझायनरला अटक
Last Updated : Dec 12, 2024, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details