पुणे Students Suffer Food Poison : कोचिंग सेंटरमध्ये NEET आणि JEE शिकवणी घेणाऱ्या 50 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात रविवारी रात्री घडली. या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी वृत्तसंस्थेला बोलताना दिली.
कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांना विषबाधा :कोचिंग सेंटरमध्ये शिकवणी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी रात्री जेवण केलं होतं. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तब्बल 50 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या विद्यार्थ्यांना जेवमातून विषबाधा झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोचिंग सेंटरमध्ये 500 विद्यार्थी घेतात शिकवणी :विषबाधा झालेल्या कोचिंग सेंटरमध्ये NEET आणि JEE परिक्षेची शिकवणी घेण्यात येते. या शिकवणी सेंटरमध्ये तब्बल 500 विद्यार्थी शिकवणीसाठी येतात. यातील 50 विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली आहे. याबाबत बोलताना खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे म्हणाले की, "या कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांनी रात्री जेवण केल्यानंतर त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं निदान झालं. या विद्यार्थ्यांना आता रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोचिंग सेंट्रमध्ये 500 विद्यार्थी NEET आणि JEE ची शिकवणी घेत आहेत. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं पोलिसांनी पंचनामा करुन अन्नाचे नमुने गोळा करुन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. विद्यार्थ्यांना विषबाधा कशामुळे झाली, याचं कारण पोलीस शोधत आहेत."
हेही वाचा :
- Police Trainees Suffer Food Poison : धुळ्यात 70 प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात केलं दाखल
- Poisoning On Husband : कलीयुगी पत्नीचा प्रताप! इंजिनियर पतीसह सासूवर विषप्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न
- पुण्याकडं येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेतील 40 प्रवाशांना विषबाधा, रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची प्रवाशी संघटनेची मागणी