महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NEET घोटाळ्यातील मास्टरमाईंड लातुरातील शिक्षकाच्या संपर्कात; 'गंगाधर'ला ताब्यात घेण्यासाठी लातूर पोलीस बंगळुरूत - NEET Exam Scam Case

NEET Exam Scam Case : NEET परीक्षा घोटाळ्यातील आरोपी गंगाधरला अटक करण्यासाठी लातूर पोलीस बंगळुरूला पोहोचले आहेत. लातूरचा आरोपी संजय जाधव हा थेट 'नीट' परीक्षा घोटाळ्यातील मास्टरमाईंड आरोपी गंगधरच्या संपर्कात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. त्यामुळं या प्रकरणात आता नवा ट्विस्ट उघड होण्याची शक्यता आहे.

NEET exam scam
फाईल फोटो (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 6:12 PM IST

Updated : Jul 7, 2024, 10:34 PM IST

लातूर NEET Exam Scam Case : 'नीट' घोटाळ्यातील लातूरचा आरोपी संजय जाधवनं पोलीस कोठडीतून सीबीआयला महत्वाची माहिती दिली. त्याआधारे या प्रकरणातील आरोपी गंगाधरला गुरुवारी (4 जून) राजी आंध्रप्रदेशात अटक करण्यात आली. तो सध्या बंगळुरूत सीबीआयच्या ताब्यात आहे. त्यामुळं आरोपी संजय जाधवच्या पोलीस कोठडीत 8 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली असून, आरोपी जलील पठाणला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

प्रतिनिधी अजय घोडके माहिती देताना (ETV BHARAT Reporter)

संजय जाधव गंगाधरच्या संपर्कात : 'नीट' घोटाळ्यात लातुरातील आरोपी संजय जाधव तसंच जलील पठाण यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपी संजय जाधव थेट गंगाधरच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. जाधवनं दिलेल्या माहितीच्या आधारेच गंगाधरला आंध्र प्रदेशातून सीबीआयनं अटक केली. सीबीआय आरोपी गंगाधरची सध्या बंगळुरुत चौकशी करत आहे, असं सीबीआयचे अधिकारी कुणाल अरोरा यांनी न्यायालयात सांगितलं.

संजय जाधवच्या घराची झडती : सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपी संजय जाधवच्या लातुरातील घराची झडती घेतली. यावेळी त्याच्या घरात आणखी एक संशयास्पद मोबाईल आढळून आला. हा मोबाईल खास आरोपी गंगाधरला बोलण्यासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत कागदपत्रं सीबीआयनं आरोपी जाधवच्या भावासमोर जप्त केली आहेत. त्यामुळं आरोपी संजय जाधव हा थेट 'नीट' घोटाळ्याचा मास्टरमाईंड आरोपी गंगाधरच्या संपर्कात असल्याचं उघड झालंय.

गंगाधर म्हणजे एन.गंगाधर आप्पा : लातुरात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चौथा आरोपी गंगाधर हा तपास यंत्रणांना गुंगारा देत फरार होता. परंतु लातुरात सीबीआयच्या कोठडीत असलेल्या संजय जाधवनं तोंड उघडताच आरोपी गंगाधरचं लाईव्ह लोकेशन सीबीआयच्या अधिकाऱ्यांना समजलं. त्यानंतर तत्काळ बंगळुरूतील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपी गंगाधरला आंध्रप्रदेशातून अटक केली. आरोपी संजय जाधवच्या लातुरातील घरातून जप्त केलेला मोबाईल, कागदपत्रांच्या आधारे दिल्लीतील आरोपी गंगाधरचं नाव 'एन. गंगाधर आप्पा' असं असल्याची नोंद सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आपल्या रेकॉर्डवर केली आहे.

दोघांची समोरासमोर चौकशी : सीबीआय अधिकाऱ्यांनी आरोपी जलील पठाण, संजय जाधव यांच्या मोबाईलमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेचे प्रवेशपत्र सापडले, त्यांच्यासह त्यांच्या पालकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी संजय जाधव हा थेट गंगाधरच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. त्यामुळं गंगाधर तसंच संजय जाधव या दोघांची समोरासमोर लातूरात सीबीआयचे अधिकारी चौकशी करणार आहेत. आरोपी गंगाधरला लातूरला घेऊन येण्यासाठी लातूर पोलिसांचं एक पथक बंगळुरूमध्ये दाखल झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

इरान्ना कोंगुलवारचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज : नीट घोटाळा प्रकरणी गुन्ह्यातील तिसरा आरोपी इरान्ना मष्णाजी कोंगुलवार हा कुटुंबीयांसह अद्याप फरार आहे. धाराशिवच्या उमरगा येथील आयआयटीचा तो सुपरवायझर आहे. नांदेड एटीएसच्या तक्रारीवरून लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी इरान्ना कोंगुलवारचा मोबाईल लातूर पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्ह्यातील चार पैकी तीन आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणेला यश आलंय. नीट घोटाळ्याचा दिल्ली येथील मास्टरमाइंड गंगाधरला देखील पकडण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. आरोपी इरान्ना कोंगुलवारच्या अटकपूर्व जामीनासाठी लातूरच्या न्यायालयात त्याच्या वकीलानं अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

'हे' वाचलंत का :

  1. NEET पेपर लिक प्रकरण : सीबीआयनं धनबादमधून अमन सिंगला केलं अटक, आतापर्यंत चार जणांना ठोकल्या बेड्या - NEET Paper Leak Case
  2. नीट परीक्षेवरील लोकांचा विश्वास उडाला- अभिनेता थलपतीनं केंद्र सरकारला 'ही' केली विनंती - ACTOR VIJAY on NEET
  3. नीट-पीजी परीक्षेतही हेराफेरी? 15 हजार विद्यार्थी संशयास्पद; आरोपींच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर - NEET Paper Leak Case
Last Updated : Jul 7, 2024, 10:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details