ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरच्या दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा, एसआयटी चौकशी होणार - NEET Paper Leak Case - NEET PAPER LEAK CASE

NEET Exam Maharashtra Connection : वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आलीय. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरच्या दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

NEET Exam Maharashtra Connection
नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरच्या दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा (Source reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 9:36 AM IST

Updated : Jun 24, 2024, 11:49 AM IST

लातूर NEET Exam Maharashtra Connection : वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे लातूरपर्यंत पोहोचल्याचं उघड झालंय. याप्रकरणी नांदेडच्या एटीएसच्या पथकानं शनिवारी रात्री लातूरमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर नोटीस देऊन त्या दोघांनाही सोडण्यात आलं. मात्र, रविवारी सायंकाळी संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. तसंच इरन्ना मष्णाजी कोनगलवार आणि दिल्ली येथील गंगाधर अशा एकूण चौघांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरच्या दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा दाखल (Source reporter)

एसआयटी स्थापन :या चौघांविरोधात लातूरच्या The Public Examinations (Prevention of Unfair Means) Act 2024 चे कलम 3(v), 4 आणि 10 सह कलम 420, 120 (ब) भारतीय दंड सहिंता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या नेतृत्वाखाली एका 'एसआयटी'ची स्थापना करण्यात आली आहे.

चौघांविरोधात गुन्हा दाखल : वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीचे लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर नांदेडच्या एटीएस पथकानं लातूरमध्ये शनिवारी छापेमारी केली. लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं. संजय जाधव हे चाकूर तालुक्यातील बोथी येथील रहिवासी आहेत. ते सोलापूर जिल्ह्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तर जलील पठाण लातूरजवळील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघंही लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवत होते. नांदेड एटीएसनं या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी रात्रभर कसून चौकशी केली. त्यानंतर रविवारी रात्री लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या दोन्ही शिक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा -

  1. नीट पेपर फुटी प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन, लातूरमधून दोन शिक्षकांना एटीएसनं घेतलं ताब्यात - NEET Paper Leak Case
  2. नीट परीक्षेचा घोळ थांबेना : पेपर फुटीसह शिक्षण माफियांसमोर पंतप्रधान मोदी हतबल झालेत, विरोधकांचा हल्लाबोल - NEET PG Exam Postponed
  3. नीट पेपर लीक प्रकरण: चौथी पास ट्रॅक्टर चालकाला अटक, जाणून घ्या त्याचा कसा आहे सहभाग ? - NEET Paper Leak Case
Last Updated : Jun 24, 2024, 11:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details