महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, पालकमंत्री बेपत्ता", पालकमंत्री नाही थाऱ्यावर, जनतेला सोडलं वाऱ्यावर, बॅनरमधून उडवली मंत्र्यांची खिल्ली - Shambhuraj Desai Missing Banner

Shambhuraj Desai Missing Banner : ठाणे जिल्ह्यातील विकासाचा प्रश्न, पाणीटंचाई आणि आरोग्यविषयक प्रश्न कायम आहेत. अशा परिस्थितीत पालकमंत्री शंभूराज देसाई गेल्या दोन वर्षात मुरबाड तालुक्यासह जिल्ह्यात जराही न फिरकल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे दीपक वाघचौडे यांच्यातर्फे करण्यात आलाय. त्यांनी मुरबाड बस स्थानकासमोर पालकमंत्री बेपत्ता असल्याचं बॅनर लावलयं. वाचा काय आहे मुद्दा...

Shambhuraj Desai Missing Banner
पालकमंत्री शंभूराज देसाई बेपत्ता असल्याचं हेच ते बॅनर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 9:12 PM IST

ठाणे Shambhuraj Desai Missing Banner: ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शोधून देणाऱ्यास गावठी कोंबडा आणि वळगनीचे मासे बक्षीस म्हणून जाहीर केले आहेत. याबाबत मुरबाड शहरासह तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी बॅनरबाजी केल्यानं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चेचा विषय ठरला आहे.

दीपक वाघचौडे यांनी लावलेले हेच ते बॅनर (ETV Bharat Reporter)

कोंबडे आणि गाबोलीच्या माशांचं बक्षीस :साहेब! आपला पत्ता कुठेच लागत नाही. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. जिथं कुठं असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पाहतोय. आपल्या जिल्ह्यात असंख्य समस्या आहेत. शरद पवार गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे यांच्या बॅनरबाजीची चर्चा सध्या मुरबाडमध्ये होत आहे. चक्क कोंबडे आणि गाबोलीचे मासे बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आले आहेत, असं बॅनरवर लिहिलंय.

पालकमंत्र्यांवर कोंबड्यांची पैज :मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील मुरबाड-तालुक्यातील २ जानेवारीचा सिद्धगडावरील हुतात्म्यांची शासकीय मानवंदना असो की, जिल्ह्यासह तालुक्यातील भीषण पाणीटंचाई, रोजगार नसल्याने वाड्यापाड्यावरील कुपोषणाचा विळखा असो की, नुकताच घडलेली ओजिवले वाडीतील अदिवासी महिलेची प्रसूतीसाठी झोळीतील प्रवास असो की, मुरबाड कल्याण रस्त्यावरील चिखलयुक्त जीवघेणा प्रवास याशिवाय मुंबई-नाशिक मार्गावरील भिवंडी बायपास ते ठाणे दोनदोन तासाचा वाहतूक खोळंबा असो या जिल्ह्याबाबत शिंदे सरकार अनभिज्ञ आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील ठाणे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पालकमंत्री झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत ते मुरबाड तालुक्यासह जिल्ह्यात न फिरकल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला.

बस स्थानकासमोर लावलं 'या' आशयाचं बॅनर :गेल्या आठवड्यात मुरबाड तालुक्यातील ओजिवले कातकर वाडीच्या रस्त्यांबाबत केंद्रीय मंत्री कपिल पाटील, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्परता दाखविली; मात्र पालकमंत्री म्हणजे काय रं दादा? असं म्हणायची वेळ जिल्ह्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांवर आल्याचा टोमणाही दीपक वाघचौडे यांनी शिंदे सरकारला लगावला. दरम्यान, मुरबाड तालुक्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी मुरबाड बस स्थानकासमोर 'पालकमंत्री दाखवा आणि कोंबडा मिळवा' ह्या बॅनरबाजीने एकच राजकीय चर्चा सुरू होऊन या अनोख्या कल्पनेला नागरिक देखील दाद देत असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे बेकायदा ढाबा, बियर बार, हुक्का पार्लर, यावर सध्या कारवाई सुरू आहे; मात्र याविषयी पालकमंत्री शंभूराज देसाई हे अद्यापही प्रसारमाध्यमांसमोर आले नसल्याचा आरोपही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला.

हेही वाचा:

  1. पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी; मुंबईकरांना अपॉइंटमेंट्ससाठी 'स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल'चे दरवाजे केले खुले... - Small Animal Hospital
  2. ड्रेसकोड लागू केल्याप्रकरणी आमदार सरनाईकांची मुंबईतील कॉलेजवर कारवाईची मागणी, म्हणाले हा 'तालिबानी फतवा' - mla Pratap Sarnaik
  3. ३२७ कोटीचं एमडी ड्रग्ज जप्त, मुख्य सूत्रधार सलीम डोळाचं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन उघड - 327 crores MD drug seized

ABOUT THE AUTHOR

...view details