मुंबई Mumbai Railway Mega Block: मध्य रेल्वेनं (Central Railway) उपनगरीय रेल्वे सेवेच्या वाहतूकीत गुरूवारी मध्यरात्रीपासून सुमारे ६३ तासांचा मेगाब्लॉक घोषित केलाय. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेनं २ जूनपर्यंत ६३ तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केलाय. तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी ३० आणि ३१ मेच्या मध्यरात्री ते २ जूनच्या दुपारपर्यंत ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळं मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. याचा फटका या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या तब्बल ३३ लाख प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरचदंद्र पवार पक्षाचे मुंबई युवाअध्यक्ष अमोल मातेले यांनी आज सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात जोरदार आंदोलन केलं.
आठवडाभर आधी सुचना देणे आवश्यक :मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक आठवडा पूर्वसूचना देणं अपेक्षित होतं. मात्र, ब्लॉक सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर ब्लॉकची घोषणा केल्यानं प्रवासी संतप्त झाले आहेत. मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अँड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे घोषणाबाजी करत मेगाब्लॉक मागे घेण्याची मागणी करण्यात आली.