छत्रपती संभाजीनगरNavneet Rana Vs Asaduddin Owaisi Controversy : AIMIM (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) तसंच नवनीत राणा यांच्यातील शाब्दिक युद्ध वाढत चाललं आहे. आम्ही खुंखार आहे, असं वक्तव्य ओवैसी यांनी केलं होतं. त्यावर नवणीत राणा यांनी तिखट शद्बात प्रतिक्रिया दिली आहे. 'अशा खुंखाराना छत्रपतीशिवाजी महाराज यांना मानणारे आम्ही मोजत नाही. आशांना आम्ही घरात पाळतो. तुम्ही समजून जा घरात कुणाला पाळतात, अशी टीका नवनीत राणा यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. अकबर ओवैसी सारख्या तोफांना आम्ही घराबाहेर ठेवतो, अशी मिश्किल टीका नवनीत राणा यांनी केली.
काँग्रेस, एमआयएमचं रक्त एकच : एमआयएम,काँग्रेसचं रक्त एकच आहे. हैद्राबादमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळंच गुन्हा दखल करण्यात आला. उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रात सरकार असताना माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. ओवैसींनी हेट स्पीच देऊनसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र, माझ्यावर गुन्हा दाखल होतो. मी यापूर्वी सांगितलं होतं, मी मुंबईला हनुमान चालीसा पठणासाठी जाणार आहे. आता पुन्हा सांगितलं मी हैदराबादला येणार आहे. ज्याच्यात दम असेल त्यांनी रोखून दाखवा, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.