नाशिकPoliceman arrested in riot case :नाशिक शहरातील बजरंगवाडी परिसरात 14 जुलैला रात्रीच्या सुमारास दोन गटात हिंसाचार झाला. यावेळी दोन गटातील संशयितांकडून धारधार शस्त्र, लाठ्या-काठ्यांचा वापर करीत एकमेकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तसंच परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या घटनेत अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील संशयितांविरोधात दंगल करणे, खुनाचा प्रयत्न आदी कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
हिंसाचार प्रकरणी बजरंगवाडी परिसरातील राहुल ब्राह्मणे, नवाज खान, अभिषेक जाधवसह इतर 5 ते 6 साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर खडकाळी भागातील मतीन शेख,जफर शेख, जुनीद सय्यद , युसुफ शेख यांच्यासह 7 ते 8 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गटातील 8 संशयितांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यातील 7 जणांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
हिंसाचारात पोलिसाचा सहभाग :पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हिंसाचाराच्या घटनेचे सखोल चौकशीचे आदेश दिले होते. यात पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अंमलदार इरफान मन्सूर शेखचा हिंसाचारात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं. सखोल तपासात इरफान शेखसोबत इतर संशयित आरोपींनी मोबाईलवरून संपर्क साधल्याचं उघड झालं. पोलिसांनी संशयित इरफान शेख याला हिंसाचार प्रकरणी अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अवैध तस्करांनी पोलीस ठाण्यास साजरा केला वाढदिवस : अवैध दारू तस्करांनी वणी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे यांचा वाढदिवस साजरा केला. इतकंच नाही, तर सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला होता. या प्रकारामुळं पोलीस खात्याची प्रतिमा चांगली वेशीला टांगली होती. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळं यांची तात्काळ उचलबांगडी करीत नियंत्रण कक्षात बदली केली आहे. या कारवाईमुळं पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वीच पोलीस अकादमीतील महिला पोलिसावर बलात्कार झाल्यानं नाशिकमधील पोलिसांची प्रतिमा झाली होती. सततर अशा घटना घडल्यानं पोलीस दलात चिंता व्यक्त होत आहे.
हेही वाचा-