महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये नफ्याचं दाखवलं आमिष; 23 जणांना 14 कोटींचा गंडा - Nashik Fraud News - NASHIK FRAUD NEWS

Nashik Fraud News : नाशिक शहरात दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीत वाढ होत असून, सायबर भामट्यांनी शेअर मार्केटिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवून 23 जणांना तब्बल 14 कोटींचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे.

Nashik Fraud News
ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये घातला 14 कोटींचा गंडा (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 6:46 PM IST

नाशिक Nashik Fraud News: मोठया आर्थिक फायद्याची आमिष दाखवून परराज्यात बसून ऑनलाइन पद्धतीने लाखो रुपये बँक खात्यातून परस्पर लांबवणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीनं आताफसवणुकीचा नवा ट्रेंड शोधाला आहे. नाशिक शहरात मागील सहा महिन्यात फेक ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून 23 जणांना तब्बल 14 कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. याबाबत नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक रियाज शेख (ETV BHARAT Reporter)

अशी झाली फसवणूक : सायबर गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता शेअर ट्रेडिंगच्या नावाने नागरिकांची बँक खाते रिकामी केली जात आहे. बनावट एप्लीकेशन आणि व्हाट्सअप ग्रुप तयार करून टीप आणि नफा देण्याची आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडले जाते. आभासी पद्धतीनं बनावट ॲपवर प्रॉफिटचा आकडा दाखवला जातो हा आकडा सुद्धा खोटा असतो. मुळात तेवढा नफा शेअर धारकांच्या खात्यात जमा झालेल्या नसतो. मात्र, याच आभासी पैशाला शेअर धारक भुलत गुंतवणूक करत आहेत. मात्र, जेव्हा बँक खाते रिकामे होते आणि गुंतवलेले पैसे सुद्धा मिळत नाही. तेव्हा आपली फसवणूक झाली आहे असं कळल्यावर नागरिक सायबर पोलिसात धाव घेतात.


6 महिन्यात 23 गुन्हे दाखल :नाशिक शहरात बोगस शेअर ट्रेडिंगद्वारे फसवणूक झाल्याचं 6 महिन्यात एकूण 23 तर, वेगवेगळ्या प्रकरणात फसवणुकीला बळी पडलेले एकूण 40 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक गुन्हे बोगस शेअर्स ट्रेडिंगद्वारे झालेल्या फसवणुकीचे आहेत. तसेच बनावट कॉलिंगद्वारे संपर्क साधून वेगवेगळ्या प्रकारची भीती दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी 6 तर ऑनलाईन पार्ट टाइम जॉबच्या आमिष दाखवून गुंतवणुकीचे पाच गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.



उच्चशिक्षित लोक पडतात बळी : सायबर गुन्ह्याचे बळी उच्चशिक्षित सुशिक्षित लोक ठरत आहे. यामध्ये इंजिनियर, सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक, डॉक्टर अशा पेशातील सुशिक्षित लोक सायबरच्या जाळ्यात अडकल्याचं आत्तापर्यंत दाखल विविध गुन्ह्यांमध्ये समोर आलं आहे. त्यामुळं सोशल मीडिया हाताळताना अनावश्यक एप्लीकेशन डाउनलोड करणं टाळलेलं बरं असा सल्ला, सायबर पोलिसांनी दिला आहे.



सोशल मीडिया वापरतांना काळजी घ्या :सध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यात नव्याने बोगस शेअर्स ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक होत आहे. तसेच प्रत्येकाने आपल्या प्रोफाइलची काळजी घेणं गरजेचं आहे. खास करून मुलींना आपले प्रोफाइल लॉक ठेवले पाहिजे. अनेक घटनांमध्ये हॅकर्स मुलीचे अश्लील फोटो वापरून ब्लॅक मेल करणं, तसेच सध्या पार्ट टाइम जॉबच्या नावाने अनेक लाखोंचा गंडा घातला जात आहे. त्यामुळं पूर्ण खात्री केल्याशिवाय आपण पैसे पाठवू नये किंवा अज्ञात व्यक्तिला आपल्या बँकेचा तपशील देऊ नये. तसेच मोबाईलवर येणारी कोणतीही लिंक क्लिक करू नये, अनेक केसेसमध्ये रिमोर्ट एक्सेस अँपचा वापर करून हॅकर्स बँक खाते रिकामे करतात. अशी कुठली ही लिंक आल्यास किंवा कोणी अज्ञात व्यक्तीने ओटीपी मागितला तर सायबर सेलशी संपर्क साधण्याचं आवाहन, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रियाज शेख यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. कर्ज घेताना सावधान! विनातारण कर्जाचं आमिष दाखवून नाशिकमधील शेकडो गुंतवणूकदारांना 34 लाखांचा गंडा - Nashik Fraud News
  2. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नाशकात महिलेवर अत्याचार
  3. 17 कोटी 94 लाख 75 हजारांचा गंडा : आरोपीला पोलिसांनी तिरुपतीत बेड्या ठोकल्या, एक वर्षापासून होता फरार - Fraud of investors in Mumbai

ABOUT THE AUTHOR

...view details