महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलीनं प्रेमविवाह केल्याचा राग; डोक्यात कुकर घालून पत्नीचा केला खून, आरोपीला अटक - NASHIK CRIME

पत्नीच्या डोक्यात कुकरचं झाकण मारून तसंच कोयत्याचा वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Nashik crime news woman killed by husband after fight over daughter love marriage accused arrested
डोक्यात कुकर घालून पत्नीचा केला खून (संग्रहित छायाचित्र) (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2025, 7:44 AM IST

नाशिक : मुलीनं प्रेमविवाह केल्याच्या रागातून पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केली. पत्नीच्या डोक्यात कुकर मारून कोयत्यानं वार करत खून केल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोड भागातील डी के नगर परिसरात घडलीय. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी पती छत्रगुण गोरेला अटक करण्यात केली आहे.

नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रगुण गोरे (वय 50) खासगी वाहन चालक आहे. तो आपल्या कुटुंबासह डी के नगर, गंगापूर रोड येथे राहत होता. त्यांच्या एका मुलीनं आई-वडिलांची पसंती नसताना विरोधात जात लग्न केल्याचा राग छत्रगुण याच्या डोक्यात होता. या कारणावरून तो नेहमीच पत्नी सविता गोरे यांच्यासोबत भांडण करत असत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सविता या पार्किंगमध्ये आलेल्या मुलीशी फोनवरून बोलत होत्या. तेव्हा छत्रगुणनं पत्नीशी वाद घालता. त्यानं सविताच्या डोक्यात कुकर मारला. त्या खाली पडल्यावर तोंडावरही कुकर मारत त्यांना जखमी केलं. त्यानंतर कोयत्यानं पत्नीवर वार केले. या दरम्यान फोनमध्ये किंचाळण्याचा आवाज आल्यानं इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेली मुलगी फ्लॅटपर्यंत आली. छत्रगुणनं दरवाजा उघडून पळून गेला. तोपर्यंत सविता यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मुलीनं तत्काळ पोलिसांना दिली. यानंतर रात्री उशिरा आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

रागाच्या भरातून पत्नीची हत्या : "आरोपीला तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुलींचं लग्न झालंय. मात्र, त्यातील एका मुलीनं प्रेमविवाह केला होता. याचा राग पतीच्या मनात होता. यावरू पती-पत्नीचे नेहमीच भांडण व्हायचे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारासदेखील असाच वाद झाला. यात पतीनं पत्नीच्या डोक्यात कुकरनं मारहाण करत कोयत्यानं वार केला. यात पत्नीचा मृत्यू झाला. तर काही तासातच आम्ही संशयित छत्रगुण गोरे याला अटक केली आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे यांनी दिली.

हेही वाचा -

  1. भाऊबीजेलाच बहिणीसह मेहुण्याची हत्या; जमिनीच्या वादातून घडली घटना
  2. नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत; टोळक्याकडून तरुणाला मारहाण - Nashik Koyta Gang
  3. तीन मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या, दोघे फरार - Nashik Crime

ABOUT THE AUTHOR

...view details