महाराष्ट्र

maharashtra

पती-पत्नीची मुलीसह आत्महत्या, कुटुंबाकडून कंपनीवर गंभीर आरोप - Nashik Suicide News

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 7:59 PM IST

Nashik Suicide News : नाशिक शहरात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. आत्महत्येचं कारण हे कंपनीतील प्रशासन असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Nashik Suicide News
एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या (Source - ETV Bharat Reporter)

नाशिक Nashik Suicide News :नाशिक येथील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या विजय सहाणे यांनी आपल्या पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. एका कंपनीत कामगार असलेल्या विजय सहाणे यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी कंपनीवर आरोप केले आहेत. विजयच्या आत्महत्येचं कारण कंपनीतील प्रशासन असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय.

नेमकं प्रकरण काय? : याबाबत अधिक माहिती अशी की, विजय सहाणे हे नाशिक येथील एका कंपनीत गेल्या बारा वर्षापासून कामाला होते. कंपनीच्या जाचक नियमांमुळं विजय गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होता. त्यामुळं त्यानं आपली पत्नी आणि नऊ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं, असा आरोप विजयच्या कुटुंबीयांनी केला आहे. विजयच्या कुटुंबीयांनी कंपनीवर गंभीर आरोप केल्यानंतर या आत्महत्या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं आहे, मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

विजय सहाणे यांचे वडील माणिक सहाणे हे आज 8 वाजण्याच्या सुमारास त्यांची नात शाळेत जाण्यासाठी अजून खाली आली नाही, म्हणून तिला पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. मात्र दरवाजा आतून बंद होता. कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडला असता विजय, ज्ञानेश्वरी आणि अनन्या यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आमदार हिरामण खोसकर कुटुंबाची घेतली भेट :इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी सहाणे कुटुंबीयांची भेट घेतली. सहाणे कुटुंबानं कंपनीवर केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करावी, नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करावा, असे निर्देश आमदार खोसकर यांनी दिले. या प्रकरणाची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ते राज्य सरकारकडे करणार आहेत.

हेही वाचा

  1. कवर्धा येथील राणी दहरा धबधब्याच्या पाण्यात बुडून नागपूरच्या इंजिनीअरचा मृत्यू - Nagpur Engineer Death
  2. पुणे हादरले! ऐन गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार; तीन संशयितांना अटक - Firing On Businessman
  3. शेतात मोटर सुरू करण्यासाठी गेलेला मूकबधीर मुलगा बंधाऱ्यात बुडाला, आईच्या डोळ्यादेखत घडली घटना - Youth Drowns In River

ABOUT THE AUTHOR

...view details