नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाण पुलावर पिकअप अन् आयशरचा भीषण अपघात (Nashik Accident) झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीनं धडक दिली. या अपघातात मृत्यू झालेले सर्वजण कामगार असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळलेल्या माहितीनुसार सिडको येथील सह्याद्रीनगर भागातील रहिवासी चेतन गंभीरे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होता. या कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी परिसरातील महिला आणि पुरुष हे दोन स्वतंत्र टेम्पोमधून प्रवास करून निफाड तालुक्यातील धारणगाव येथे धार्मिकस्थळी गेले होते. सायंकाळी कार्यक्रम आटपून परतीचा प्रवास करताना महिला भाविकांना घेऊन टेम्पो नाशिकच्या दिशेने रवाना झाला. हा टेम्पो सह्याद्रीनगर येथे पोहोचून काही वेळ होत नाही तोच पुरुषांच्या टेम्पोला द्वारका चौकाच्या अलीकडे उड्डाणपूलावर भीषण अपघात झाला. टेम्पोने सळया असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की टेम्पोचा चुराडा झाला.
नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात (Source- ETV Bharat Reporter) अपघातात केबिनमध्ये लोखंडी सळ्या शिरल्यानं 6 जण जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळतात वाहतूक शाखेचे पोलीस, अग्निशमन दलाचा बंब तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचतली. तातडीने जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे द्वारका उड्डाणपुड्यावर तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. दोन तासानंतर ही वाहतूक सुरळीत सुरू झाली.
- मृतांची नावे-१)अतुल संतोष मंडलिक २) संतोष मंडलिक ३) यश खरात ४) दर्शन घरटे ५ ) चेतन पवार
- जखमींची नावे-१) प्रेम मोरे २) राहुल साबळे ३) विद्यानंद कांबळे ४) समीर गवई ५) अरमान खान ६) अनुज घरटे 7) साई काळे 8) मकरंद आहेर 9) कृष्णा भगत 10) शुभम डंगरे 11) अभिषेक, 12) लोकेश 13 सार्थक (लकी) सोनवणे
द्वारका उड्डाणपुलावर वाहतूक विस्कळीत: नाशिक मुंबई अग्रा महामार्गावरील भीषण अपघातानंतर नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर वाहतूक विस्कळीत झाली होती. नाशिकवरुन मुंबईकडं जाणारी वाहतूक ठप्प झाल्यानंतर उड्डाण पुलावर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तर ३० मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. वाहनांचा चुराडा झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा -
- नांदगाव मनमाड महामार्गावर दोन गाड्यांचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू - Nashik Accident
- पाईपलाईन कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद - Nashik Accident News
- दुधाचा टँकर दरीत कोसळल्यानं कसारा घाटात भीषण अपघात; पाच ठार, चार जण गंभीर जखमी - Nashik accident in Kasara ghat