नाशिक Nashik Farmers News : नाशिक जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळं झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाईन पोर्टलवर बाधित शेतकऱ्यांची नावं, त्यांच्या बँकेचं नाव, खातं क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर माहिती अपलोड करण्यात आली. यात जवळपास 52 हजार 782 शेतकऱ्यांनी ही माहिती अपलोड केली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांना मिळणारी गतवर्षाची दुष्काळामुळे देण्यात येणारी शासकीय मदत आता परत जाण्याची शक्यता आहे.
राज्य शासनामार्फत नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत तसंच खरीप 2023 कालावधीत झालेल्या पिकं आणि फळ पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनामार्फत ई-पंचनामा या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात खरीप हंगाम 2023 मध्ये 17 हजार 950 बाधित शेतकऱ्यांनी माहिती अपलोड करण्यात आलीय. तसंच नंतरच्या काळात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळं बाधित झालेल्या जवळपास 34 हजार 832 शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
ई-केवायसी नसल्यानं 53 हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित - eKYC - EKYC
Nashik Farmers News : नाशिक जिल्ह्यातील 52 हजार 782 खातेदार शेतकऱ्यांनी अद्यापही त्यांची बँकखाते ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळं संबंधित खातेदारांना खरीप हंगाम-2023 मधील दुष्काळाची नुकसान भरपाई देण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्यानं आर्थिक मदत पुन्हा एकदा शासकीय तिजोरीत जमा होण्याच्या मार्गावर आहे.
Published : Jun 15, 2024, 7:22 AM IST
अन्यथा मदत मिळणार नाही : ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसंच बँक खातं, आधार कार्डसोबत संलग्न केलंय. त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली. तर ज्या शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केलं नाही, त्यांनी आपली सरकार सेवा केंद्रावर ई-केवायसी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केलं आहे. जर ही माहिती अपलोड केली नाही, तर त्यांना शासकीय मदत मिळणार नसल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा -