महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुंडगिरीला पाठबळ देणारं महायुती सरकार, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बेरोजगारी महागाईच्या मुद्द्यांना प्राधान्य देणार- पटोले - Nana Patole

NANA PATOLE : महाराष्ट्रात आरक्षणाचा पेच भाजपानं निर्माण केलाय. 2014 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा, धनगर, आदिवासी समाजाला दिलेलं आरक्षणाचं आश्वासन न पाळल्यानं आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं जनतेनं महायुती सरकारला वेगवेगळी नाव दिलीय. हे सरकार गुंडगिरीला पाठिंबा देणारे असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Congress meeting in Mumbai
काँग्रेसची मुंबईत बैठक (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 9:38 PM IST

मुंबईNANA PATOLE :राज्यातील महायुती सरकार गुंडगिरीला पाठबळ देत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मुंबईत गांधीभनात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसची आज जागा वाटपाबाबत बैठक बोलवण्यात आली होती. काँग्रेस पक्षाच्या गांधीभवन येथे आयोजित बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी सरकावर टीकेचे बाण सोडले.

विविध विषयांवर चर्चा : "निवडणुकीला सामोरं जातांना जनतेच्या प्रश्नांना द्यायला हवा. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कायदा, सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात कोण कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा, यावर चर्चा झाली. काँग्रेसचा जाहीरनामा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा करून तयार करीत आहेत. काँग्रेस जाहीरनाम्याविषयी महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा केली जाईल", असं नाना पटोले यांनी म्हटलंय. "आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकार येणार नाही. महाविकास आघाडी म्हणजे तीन पक्ष नसून आमच्यासोबत अजूनदेखील छोटे-मोठे पक्ष आहेत. त्यांना देखील विश्वासात घेतलं जाईल. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा आहे. छोटा भाऊ, मोठा भाऊ असा भेदभाव नाही," असे पटोलेंनी सांगितलं.

भाजपा आरक्षणविरोधी पक्ष :"राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा, ओबीसी समाज एकमेकांविरोधात उभा राहिलाय. या प्रकारचं चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हतं. याला देवेंद्र फडणवीस यांच भाजपा सरकार जबाबदार आहे. भाजपा आरक्षणविरोधी पक्ष आहे. मराठा, ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात रोष आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांची भूमिका सरकार विरोधात आहे. भाजपा खोटं आश्वासन देऊन गेल्या दहा वर्षापासून केंद्रात सत्तेत आहे," असा टोला पटोले यांनी भाजपाला लगावला.

"कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलम्पिक स्पर्धेत आपत्र ठरलीय. खेळाडूची ऑलम्पिक स्पर्धेसाठी निवड करताना अनेक चाचण्यांना सामोरं जावं लागतं. त्यामागं त्या खेळाडूची खूप तपस्या असते. मात्र, अशा प्रकारे विनेश फोगाट यांना बाहेर पडावं लागतंय. सदर घटनेची चैकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय". - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

  • काँग्रेसच्या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

'हे' वाचलंत का :

  1. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाका - रामदास आठवले - Ramdas Athawale Vs MNS
  2. अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले.." झूठ बोले..." - Devendra Fadanvis On Anil Deshmukh
  3. अदानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शरद पवारांचे कानावर हात, शिंदे-पवार भेटीवरुन तापलं राजकारण - Sharad Pawar Meets Eknath Shinde

ABOUT THE AUTHOR

...view details