मुंबई Prataprao Bhosale Death :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धपकाळान आपल्या राहत्या घरी निधन झालं. प्रतापराव भोसले यांचा राजकीय प्रवास भुईंज गावचे सरपंच ते चारवेळा आमदार, तीन वेळा खासदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहेत. त्यांच्या निधनाचं वृत्त समजतात काँग्रेस पक्षाकडून हळवळ व्यक्त करण्यात आली आहे. प्रतापराव भोसले यांनी आयुष्यभर काँग्रेस विचार सोडला नाही. पक्ष कठीण काळातून जात असताना त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे विचार रुजवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या निधनानं एक सुसंस्कृत निष्ठावान नेता हरपला असल्याची भावना नाना पटोले (Nana Patole) यांनी शोक संदेशातून व्यक्त केलीय.
सातारा जिल्ह्याच्या विकासात मोठं योगदान : सातारा जिल्ह्यातील भुईंज गावच्या सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला त्याच्या कामाची सुरुवात झाली. वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार नंतर कॅबिनेट मंत्री पदाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या विकासात मोठं योगदान दिलं. त्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघातून १९८४, १९८९ आणि १९९१ अशा तीन लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करुन ते लोकसभेत गेले. या काळात त्यांनी अनेक महत्वाच्या समित्यांवर काम केलं होतं. १९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्याकाळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळवून राज्यात सत्ता आणली. प्रतापराव भोसले यांना पक्षाने जी जबाबदारी दिली ती त्यांनी समर्थपणे पार पाडली होती. संधीचं सोनं करत त्या पदाला न्याय देण्याचं काम केलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी राजकारणाबरोबर कृषी, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातही भरीव काम केलं होतं. सातारा जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. त्यांच्या निधनामुळं कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झालीय. प्रतापराव भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भोसले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय.