नागपूर Crime News :नागपूर शहाराजवळील हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील भीमनगर येथे खळबळजनक घटना घडली. एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बादल भाऊराव निंबर्ते असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. बादलच्या हत्या प्रकरणात राज अनिल पाटील, गंगा अजय पांडे यांसह दोन अल्पवयीन बालक सहभागी आहेत. मृतक बादल आणि आरोपी राज पाटील हे दोघेही एकाचं मुलीवर प्रेम करायचे. मात्र, त्या तरुणीनं बादलला नकार दिला होता. त्यामुळे बादल येता-जाता तरुणीला चिडवायचा. या कारणामुळे चिडलेल्या राजने मित्रांच्या मदतीने बादलची हत्या केली असल्याचे तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीनांना अटक केली आहे तर एक आरोपी मोकाट आहे.
दोघेही एकाच तरुणीच्या प्रेमात :याप्रकरणातील मुख्य आरोपी राज पाटील याचे भीमनगरमध्येचं राहणाऱ्या एका तरुणी सोबत प्रेम संबंध होते. तर मृतक बादल सुद्धा त्याच तरुणीला पसंत करायचा. बादल त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करीत होता. काही महिन्यांपूर्वी बादलने त्या तरुणीला प्रपोज केलं असता तिनं त्याला नकार दिला. त्यानंतर बादल हा तरुणीला येता-जाता चिडवत असायचा. तसंच आरोपीला देखील त्या मुलीबद्दल वाईटसाईट सांगायचा. त्यामुळे नेहमी राज आणि बादल त्यांच्यात वाद होत असे. याच गोष्टींचा राग मनात धरून आरोपी राज याने गंगा पांडे आणि दोन अल्पवयीन मित्रांसह बादलच्या हत्येचा कट रचला.