नागपूर:मनाची दुभंगलेली अवस्था (स्किझोफ्रेनिया) झालेल्या एका व्यक्तीनं शहरातील स्मशानभूमीची देखभाल करणाऱ्या 67 वर्षीय वृद्धाचा गळा चिरून खून केला. पोलिसांनी 39 वर्षीय आरोपीला अटक केली. अनोन मिथिला प्यारेजी असे आरोपीचं नाव आहे. स्किझोफ्रेनियाचे रुग्ण हत्या कशामुळे करतात? याबाबत लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दिप्ती सिंग आणि बलरामपूर हॉस्पिटलचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सौरभ यांनी माहिती दिली.
आरोपी हा मोटरसायकलवरून स्मशानभूमीत पोहोचला. तिथे त्याच्या वडिलांचे मित्र असलेल्या रमेश शिंदे यांच्याबरोबर आरोपी बोलला. त्यानंतर काही मिनिटांतच धारदार शस्त्रानं त्यांचा गळा चिरला, असे जरीपटका पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यानं प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्यानं सांगितलं. समोर काही घडतंय, हे कळण्यापूर्वीच रमेश शिंदे हे जमिनीवर कोसळले. हत्येची माहिती समजताच काही स्थानिकांनी आरोपीला पकडून मारहाण केली. त्यानंतर त्याला जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
पोलिसांचा तपास सुरू-मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेल्या रमेश शिंदे यांना मेयो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. स्किझोफ्रेनियाचा त्रास असलेला आरोपी हा चौकशीदरम्यान विसंगत विधाने करत होता. पोलीस या प्रकरणाचा आणि हत्येमागील कारणाचा तपास करत आहेत, असे अधिकाऱ्यानं सांगितलं.
स्किझोफ्रेनिया हा गंभीर मानसिक आजार (symptoms of schizophrenia) :स्किझोफ्रेनिया हा गंभीर मानसिक आजार बहुतेकदा बालपण किंवा पौगंडावस्थेत होतो. या आजाराच्या रुग्णाला इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाला या आजारामुळे आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. मानसिक आजारांमध्ये स्किझोफ्रेनिया हा सर्वात गंभीर आजार मानला जातो. स्किझोफ्रेनियाचा रुग्णामध्ये निराशा येऊनत आत्महत्येची इच्छा होते.
वास्तविक जगापासून दूर राहतात-सिव्हिल हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीप्ती सिंग यांनी सांगितले, "स्किझोफ्रेनियाचे रुग्ण अनेकदा गोंधळलेल्या स्थितीत असतात. हा आजार स्त्री-पुरुषांमध्ये कोणत्याही वयात होऊ शकतो. बरेच लोक या आजाराला 'स्प्लिट पर्सनॅलिटी' मानतात. तर हा वेगळ्या प्रकारचा विकार आहे. स्किझोफ्रेनियाचे काही रुग्ण काल्पनिक जगात राहून वास्तविक जगापासून दूर राहतात. त्यांना भावना नीट व्यक्त करता येत नाहीत. ते कधीही कोणत्याही गोष्टीबद्दल खूप भावनिक किंवा आक्रमक होतात. कधीकधी असे रुग्ण स्वतःला एका खोलीत कोंडून घेतात".
आत्महत्या किंवा खुनासारखे पाऊलही उचलतात-ईटीव्ही भारतशी बोलताना बलरामपूर रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सौरभ म्हणाले, "महिन्याभरात नव्हे तर एका दिवसात स्किझोफ्रेनियाचे आठ ते दहा रुग्ण रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये येतात. त्यांच्याकडं काही पुरावे असून शेजारी देश त्यांच्याकडून ते पुरावे घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे त्यांना वाटते. काही रुग्णांना असे वाटते की कोणीतरी त्यांना मारण्याचा प्रयत्न करीत आहे. या विचारांमुळे रुग्ण आत्महत्या किंवा खुनासारखे पाऊलही उचलतात. कधी रुग्ण स्वतःचे नुकसान करतात तर कधी इतरांना गुन्हेगार समजून हल्ला करतात".
हेही वाचा-