महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांवर मनोरुग्णानं केला हल्ला; दोघांचा जागीच मृत्यू - Nagpur Railway Station Attacked - NAGPUR RAILWAY STATION ATTACKED

एका मनोरुग्णानं नागपूर रेल्वे स्थानकावरील अनेक प्रवाशांवर हल्ला केलाय. यात दोघांचा जागीचं मृत्यू झाला असून, दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Nagpur crime
घटनास्थळी पोलीस अधिकारी (Source- ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2024, 11:11 AM IST

Updated : Oct 7, 2024, 4:09 PM IST

नागपूर : रेल्वे स्थानकावर खळबजनक घटना घडली आहे. एका मनोरुग्णानं रेल्वे स्थानकातील तब्बल 12 प्रवाशांवर हल्ला केला असून, यात दोन प्रवाशांचा मृत्यू झालाय. यात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी अटकेत :मनोरुग्णानं नागपूर रेल्वे स्थानकावरील अनेक प्रवाशांवर केलेल्या हल्ल्यामुळं दोघांचा जागीचं मृत्यू झालाय. यातील एक प्रवासी गंभीर असून, त्याच्यावर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे उपचार सुरू आहेत. गणेश कुमार डी (वय- ५४ दिंडीगुल, तामिळनाडू) असं मृताचं नाव असून, दुसऱ्या मृताची अद्याप ओळख पटली नाही. लोहमार्ग पोलिसांनी मनोरुग्ण जयराम केवट याला अटक केली आहे. आरोपी हा उत्तर प्रदेशचा निवासी असून, तो नागपूर रेल्वे स्थानकावर काय करत होता? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी (ETV Bharat Reporter)

लाकडी काठीनं केला हल्ला : संबंधित घटना नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर सोमवारी पहाटे ३ वाजून २० मिनिटांची घडली. काही प्रवासी ट्रेनची वाट बघत होते, तर काही प्रवासी व भिक्षेकरी हे फलाटावर झोपले होते. त्यावेळी एक मनोरुग्ण तिथे आला. इतर सामान्य प्रवाशांप्रमाणे त्याचा वावर असल्यानं तो मनोरुग्ण असेल आणि इतका हिंसक व आक्रमक असेल अशी कुणालाचं शंका आली नाही. काही वेळ स्थानकावर वावरल्यानंतर अचानक त्या मनोरुग्णानं लाकडी काठीनं प्रवाशांवर हल्ला केला. सुरुवातीला काय झाले हे कुणालाच कळाले नाही. मनोरुग्णानं काठीनं १२ लोकांवर हल्ला केला. यात दोन प्रवासी ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

आरोपी उत्तर प्रदेशचा रहिवासी :आरोपी जयराम रामअवतार केवट हा उत्तर प्रदेश राज्यातील सितापूर जिल्ह्यातील हैदरपूर येथील रहिवासी आहे. आरोपीनं स्टेशनवर अनेकांसोबत वाद घातला. त्यानंतर तो अचानक हिंसक झाला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आरोपी नागपूर रेल्वे स्थानकावर कसा पोहचला? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

आरोपी इतरांवर हल्ला करण्याच्या बेतात असताना अटक : पोलिसांनी मनोरुग्ण आरोपीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांकडून आरोपीची माहिती घेतली. त्यावेळी समजलं की, आरोपीनं पांढरा शर्ट घातला असून, त्याला घनदाट दाढी आहे. एवढ्या माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी शोध सुरू केला. आरोपी हा प्रचंड आक्रमक आणि हिंसक आहे व त्याच्या हातात काठी असल्यानं तो अन्य प्रवाशांवर हल्ला करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांनी कर्मचाऱ्यांसह आरोपीचा शोध सुरू केला. संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर आरोपी हा पुन्हा फलाट क्रमांक सातकडे दिसल्याची सूचना मिळताच 'जीआरपीएफ'च्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

Last Updated : Oct 7, 2024, 4:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details