महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीत उबाठा गटात प्रवेशाची अट घातली म्हणून महाविकास आघाडीची ऑफर धुडकावली, राजू शेट्टींचा गौप्यस्फोट - Raju Shetty On MVA Offer - RAJU SHETTY ON MVA OFFER

Raju Shetty On MVA Offer : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणूक 2024 मध्ये ऑफर दिली. मात्र राजू शेट्टी यांनी ती ऑफर धुडकावली. वेळेवर उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रवेश करण्याची अट घातल्यानं ही ऑफर फेटाळल्याचा गौप्यस्फोट राजू शेट्टी यांनी यावेळी केला.

Raju Shetty On MVA Offer
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2024, 10:54 AM IST

Updated : Sep 19, 2024, 11:26 AM IST

पुणे Raju Shetty On MVA Offer :राज्यात आगामी काही दिवसात विधानसभा निवडणूक होणार असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी तगडी लढत होणार असल्याचं स्पष्ट आहे. याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मोठा गौप्यस्फोट केला. "मला शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घातल्यानं महाविकास आघीडीची ऑफर धुडकावली," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. "आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वराज्य पक्ष, तसेच प्रहार संघटना आदींकडून तिसरी आघाडी स्थापल्या जात आहे. या संदर्भात आतापर्यंत तीन ते चार बैठका देखील झाल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते जे सांगतात ते करत नाहीत. गेल्या पाच वर्षात अडीच - अडीच वर्ष दोघांचीही कामगिरी आम्ही बघितली आहे. दोघांच्याही वृत्तीत काहीही फरक नाहीये. दोघांची वृत्ती सत्ता पिपासू असल्यानं आम्ही छोट्या मोठ्या पक्षांना एकत्र आणत आहेत," असं यावेळी शेट्टी म्हणाले.

उबाठा गटात प्रवेशाची अट घातली म्हणून महाविकास आघाडीची ऑफर धुडकावली, राजू शेट्टींचा गौप्यस्फोट (Reporter)

तिसरी आघाडी स्थापणार :राज्यातील तिसऱ्या आघाडीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "गुरुवारी आमची पुण्यात एक बैठक आहे, या बैठकीत सर्वच छोटे-मोठ्या पक्षातील प्रतिनिधी आणि नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. व्यापक आघाडी राज्यात देण्यात यावी, असा आमचा एक प्रयत्न आहे. जनतेचे प्रश्न घेऊन सामाजिक कार्यकर्ते चार वर्ष रस्त्यावरील लढाई लढतात आणि निवडणुका जाहीर झाल्या की प्रस्थापित राजकारणी पुढं येतात. निवडून येतात आणि जनतेचे प्रश्न आहे तसेच राहतात. आज राज्यात आघाडी कोणतीही असो वृत्ती तीच आहे. म्हणून अश्या प्रवूत्तीला शह देण्यासाठी प्रत्येक मतदार संघानुसार चांगले स्वच्छ चेहेरे पुढं आणून जनतेला सशक्त पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे," असं यावेळी राजू शेट्टी म्हणाले. पुढं तिसऱ्या आघाडीबाबत राजू शेट्टी म्हणाले की, "आमचं सामुदायिक नेतृत्व असणार आहे. यात कोणीही नेता नसणार नाहीये. या प्रयत्नांना आम्हाला यश येणार आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

म्हणून महाविकास आघाडीचा ऑफर फेटाळली : लोकसभेच्या निवडणुकीबाबत राजू शेट्टी म्हणाले की, "लोकसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडणार असल्याचं जे सांगत होते, हे अत्यंत खोटं आहे. शेवटच्या वेळेस त्यांनी आम्हाला शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची अट घातली, म्हणून मी ती नाकारली होती," असं यावेळी राजू शेट्टी म्हणाले. राज्यात सत्ताधारी तसेच विरोधक यांचा संघर्ष पाहायला मिळत आहे. याबाबत राजू शेट्टी यांना विचारलं असता ते म्हणाले की, "महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते जे सांगतात ते करत नाहीत. गेल्या पाच वर्षात अडीच - अडीच वर्ष दोघांचीही कामगिरी आम्ही बघितली आहे. दोघांच्याही वृत्तीत काहीही फरक नाहीये. दोघांची वृत्ती सत्ता पिपासू आहे," असं यावेळी शेट्टी म्हणाले.

भाजपाला रोखा म्हणायचं अन् :लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस भाजपाला रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र आले. विधानसभेबाबत राजू शेट्टी यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "भाजपाला रोखण्यासाठी एकत्र यायला पाहिजे, असं म्हणायचं आणि महाराष्ट्राचा सातबारा आमच्या बापजाद्याचाच असल्याची वृत्ती बाळगायची असं कसं होणार, म्हणून आमची आघाडी ही प्रस्थापितांच्या विरोधात असणार आहे. राज्य सरकारकडून लाडकी बहीण तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या अनेक योजना पुढं केल्या जात असून त्याची जाहिरातबाजी देखील केली जात आहे. मात्र या योजना फक्त कागदावरील असून प्रत्येक्षात काहीच नाही. आज देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. महाराष्ट्रात दररोज 11 ते 12 शेतकरी हे आत्महत्या करत आहेत. म्हणून सरकारनं शेतकऱ्यांच्या दररोज होणाऱ्या आत्महत्यावर जाहिरात करावी," असा टोला यावेळी राजू शेट्टी यांनी लगावला.

हेही वाचा :

  1. का झालं राजू शेट्टींचं 'डिपॉझिट' जप्त; पराभवानंतर शेट्टींची भावनिक पोस्ट - Hatkanangale Lok Sabha results
  2. राजू शेट्टींचा लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? राज्यव्यापी बैठकीत 'स्वाभिमानी' करणार विचारमंथन - Swabhimani Shetkari Sanghtana
  3. उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवला, ते माझ्यामुळेच नेते झालेत -राजू शेट्टी - Raju Shetty
Last Updated : Sep 19, 2024, 11:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details