मुंबई Marine Drive :मुंबईतील मरीन ड्राइव्हवर समुद्र आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी अनेक लोक येतात. मात्र, मरीन ड्रायव्हर एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एक महिला सुंदर महल जंक्शन जवळ समुद्रात पडली होती. महिला समुद्रातील पाण्यात बुडत असल्याची माहिती मिळताचं सीपीआरच्या दोघा जवानांनी महिलेला जीवनदान दिलं, अशी माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी दिली आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं: गुरुवारी पावणे तीनच्या सुमारास स्वाती कनानी (वय 59) ही महिला पाय घसरून समुद्रात पडली. हे समुद्रात पडलेल्या महिलेचं नाव असून त्या अविवाहित आहेत. महिला ही सुंदर महल जंक्शन जवळीत समुद्रात बुडत असल्याचं तेथे असलेल्या दोन सीपीआर प्लाटूमधील पोलिसांच्या नजरेस आलं. हायटाईड असूनदेखील पोलिसांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महिलेला जीवनदान दिलं. हे बचावकार्य २० मिनिटे चालले. रिंग, टायर आणि सेफ्टी रस्सीचा वापर करून कॉन्स्टेबलनं पटकन कानानी या महिलेला पाण्यातून बाहेर काढले. किरण अशोक ठाकरे आणि अमोल ज्ञानदेव दहिफळे महिलेचे प्राण वाचवणाऱ्या पोलिसांची नावे आहेत. खबरदारी म्हणून त्यांनी महिलेला महिलेला जीटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. महिलेची प्रकृति स्थिर असून पर्स घेण्याच्या प्रयत्नात असताना तिचा तोल घसरला. ती सुमुद्रात पडली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.