मुंबई Water Cut in Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणातून पाणी मुंबईत आणणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पवई येथे आज (23 ऑगस्ट) दुपारी 1 वाजेच्या सुमारास मोठी गळती लागल्याचं समोर आलं. आता या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतलं आहे. काम पूर्ण होईपर्यंत जवळपास अर्ध्या मुंबईचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं पालिकेनं जाहीर केलंय. एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठा 24 ऑगस्ट रोजी बंद राहणार असल्याचं पालिकेनं म्हटलंय.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईला एकूण सात धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यातील एक मुख्य धरण म्हणजे तानसा धरण आहे. याच तानसा धरणातील पाणीसाठा पाईपलाईननं मुंबईत आणला जातो. त्याच पाईपलाईनला पवई आरे कॉलनी येथे गळती लागल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं पालिकेचं लाखो लिटर पाणी वाया गेलं. सदर घटनेची माहिती स्थानिक लोकांनी तात्काळ पालिकेला दिल्यानंतर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाणी पुरवठा विभागाकडून कामाला सुरुवात केल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. तसंच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व्हॉल्व्ह तात्काळ बंद करण्यात आला आहे. पवई ते मरोशी बोगद्याच्या शटरपर्यंत विलगीकरण आवश्यक असल्याचं पालिकेनं म्हटलंय.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पवई येथे जलवाहिनी फुटली, 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद - Mumbai Water Cut - MUMBAI WATER CUT
Water Cut in Mumbai : पवई आरे कॉलनी येथे तानसाची 1800 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटलीय. त्यामुळं मुंबईतील अनेक भागात 24 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Published : Aug 23, 2024, 10:43 PM IST
'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद : पालिकेनं पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असली तरी त्यासाठी बराच अवधी लागणार आहे. त्यामुळं शनिवारी (24 ऑगस्ट) जी उत्तर विभागातील धारावीत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलंय. या भागात नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे 4.00 ते दुपारी 12.00 आणि दुपारी 4.00 ते रात्री 9.00 आहे. के पूर्व विभाग म्हणजे विलेपार्ले भागातील प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी 1/2, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगरसह इतर भाग. एच पूर्व विभागातील वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर, बेहरामपाडा परिसर. एस विभाग म्हणजे कांजूरमार्ग पूर्व परिसरातील गौतम नगर, जयभीम नगर या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळं या भागातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय.
हेही वाचा -
- पावसामुळं अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांसाठी गुडन्यूज; 29 जुलैपासून मुंबईतील पाणी कपात रद्द - Mumbai Water Cut
- आर्थिक राजधानीत 25 टक्के पाणी कपात नाही, बीएमसी प्रशासनानं काँग्रेसचे फेटाळले आरोप - Mumbai Water Cut
- Mumbai Water Supply Reduction: जलशुद्धीकरण केंद्राच्या परिरक्षण कामामुळे 24 एप्रिल पर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 5 टक्के कपात